ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक:पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतरही अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा; बॅरिकेड्स बाजून केले- VIDEOS

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या भव्य ट्रॅक्टर रॅलीला परवानगी नाकारत आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावले होते. मात्र, शिवसेना (उबाठा) नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी पोलिसांची ही बंदी झुगारून लावली. दानवे यांनी स्वतः आक्रमकपणे रस्त्यावरील बॅरिकेड्स बाजूला करत क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा महामोर्चा पुढे नेला. आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा, पण शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणारच! असे थेट आणि रोखठोक आव्हान अंबादास दानवे यांनी सरकारला दिले आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईला किंवा गुन्ह्यांना न घाबरता आज मराठवाड्यातील सर्व 8 ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठाकरे गटाचा भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ धडकणार आहे, असे ते म्हणाले. ही कर्जमाफी नव्हे, तर कर्ज वसुली योजना- दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. विद्यमान सरकारची ही योजना कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे. ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी सरकारने शेतकऱ्यांवर लादल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. मात्र, सध्याच्या सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यांत एल्गार कर्जमुक्तीच्या याच मुद्द्यावर आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर, तर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!” ही या आंदोलनाची मुख्य घोषणा असणार आहे. यापूर्वी पक्षाने निदर्शने आणि रास्तारोको सारखी आंदोलने केली होती; मात्र आता शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर थेट रस्त्यावर आणून सरकारला जाग आणली जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अंबादास दानवेंनी ट्विटर एक्सवर केलेली पोस्ट..
हे ही वाचा.. कॉकरोच जनता पार्टीचा आज नागपुरात एल्गार: जयपूरच्या थप्पड प्रकरणानंतर अभिजीत दिपके मैदानात,
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शहरातील संविधान चौकात दुपारी ४ वाजता हे आंदोलन पार पडणार आहे.सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर