ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

उद्धव ठाकरेंनी ‘जायचे त्यांनी जा’ असे म्हटलेच नाही:संजय राऊत म्हणाले – ते वाक्य त्यांच्या तोंडी घातले; सत्ताधाऱ्यांचा धाक, ईडी अन् सीबीआयमुळेच सर्व सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य आहे. यावेळी त्यांनी असे काही म्हटले नाही. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा, अमित शहा यांचा धाक म्हणजे काय आहे? हा काही व्यक्तिगत धाक नाही. त्यांच्या हातामध्ये ईडी, सीबीआय आहे म्हणून हा धाक आहे. उद्या सत्तेवर नसाल तेव्हा कसला तुमचा धाक? आमच्याकडे ईडी, सीबीआय असते तर आमचाही धाक राहिला असता. एका मंत्र्याला खासदार भेटला त्यात काही गैर नाही. उद्या जर माझ्या कामासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटायचे असेल तर मी सुद्धा त्यांना भेटेल. राष्ट्रहिताचे काम असेल तर मी नक्कीच पंतप्रधान मोदींना भेटेन. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांसोबत मी लोकांच्या कामासाठी चर्चा करत असतो. राजकारण वेगळे आणि लोकांची कामे करणे ही वेगळी गोष्ट आहे. आमचा बैठकीच्या वेळी अमित शहा यांच्याशी सुद्धा संवाद होत असतो.

मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी खुले संजय राऊत म्हणाले की, आज जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती गेल्या 12 वर्षांपासून देशात आहे. तृणमूल काँग्रेसचे 20-22 खासदार यांनी कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय पक्षात प्रवेश केला आहे. याला तुम्ही भाजपची हाव म्हणणार. पण शिवसेनेबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही. कोणत्या खासदारांनी पक्षाविरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. शरद पवार यांच्यानंतर लोकप्रतिनिधींना भेटणारा उद्धव ठाकरेंसारखा दुसरा नेता आज महाराष्ट्रात नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे सर्वांना भेटत असतात. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. ग्रामीण भागातील आमदार मुंबईत आले की ते उद्धव ठाकरेंना भेटतात. त्यामुळे उद्धव ठाकरे भेटत नाही ही बातमी चुकीची आहे. शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि राहतील. ..हे चित्र रंगवणे हे चुकीचे संजय राऊत म्हणाले की, एक खासदार मंत्र्यांना भेटला त्यावर खासदार फुटणार हे चित्र रंगवणे हे चुकीचे आहे. आमचे सर्व खासदार बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी आवाहन केले त्यानुसार ते ऑनलाईन उपस्थित राहिले यात काही चुकले का? मी गेली 24 वर्षे दिल्लीत आहे, मी भाजपच्या मंत्र्यांना भेटताना पाहिले का? जे घटनेचे पालन करत नाही, त्यांना मी भेटत नाही. आमच्या खासदारांनी आई भवानीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना शब्द दिला आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोदी, शहा, फडणवीसच विश्चासास पात्र का? संजय राऊत म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हेच विश्वासपात्र उरले आहेत का? लोकं आमच्या बाजूने आहेत. काही काळाने लोकं सत्ताधाऱ्यांना जोड्याने मारतील. देशात संविधान आणि लोकशाही कुठे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर