ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या बेपत्ता असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून शनिवारच्या सुट्टीनिमित्त एकूण 19 जणांचा ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी देवदर्शन आटोपल्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यातील काही जण समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, याच वेळी समुद्रात अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना आला नाही. त्यामुळे त्यातील 5 जण वेगाने खोल पाण्याकडे ओढले गेले आणि काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात नजरेआड झाले. आपल्यासोबतचे सहकारी बुडत असल्याचे लक्षात येताच इतर सदस्यांनी एकच आक्रोश केला. स्थानिकांकडून वाचवण्याचा प्रयत्न पर्यटक समुद्रात बुडत असल्याचे पाहताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रात पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात आहे. समुद्राला उधाण आल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मागे खेचणारा असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी तातडीने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. त्यांच्या थेट देखरेखीखाली किनारी भागात आणि समुद्रात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. गणपतीपुळ्याचा समुद्र आधीच धोकादायक मानला जात असल्याने, प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, जीवरक्षक आणि स्थानिक व्यावसायिक समुद्राच्या जोरदार प्रवाहातही शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर