ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

“मांगी”च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणाही दिल्या. मांगी तलावातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी चालेल, मात्र तलावातील पाणी वळवण्याचा निर्णय मान्य केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मते, शासनाने सर्वप्रथम कुकडी प्रकल्पातून मांगी तलावात कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी आणण्याचे प्रयत्न करावेत. कुकडीचे पाणी तलावात सोडून स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच इतर कोणत्याही योजनेचा विचार करावा. मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी विद्यापीठासाठी देण्यात येणाऱ्या निर्णयाचा आंदोलकांनी जाहीर निषेध केला. या वेळी शासनाच्या वतीने पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजगुरू, नायब तहसीलदार विजय जाधव, पोलिस अधिकारी व पोलिस प्रशासन उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, सुजित बागल, अजय बागल, संतोष वारे, शिवशंकर जगदाळे, भरत अवताडे, प्रशांत बागल यांच्यासह मांगी पंचक्रोशीतील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. मांगी परिसरातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे कुकडी प्रकल्पातून दरवर्षी कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी मांगी तलावात सोडण्यात यावे. तसेच हळगावसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाइपलाइन प्रकल्पाचा फेरविचार करावा, हळगावला जाण्यासाठी चालू करण्यात येणारी पाइपलाइन आम्ही होऊ देणार नाही. पावसाळी अधिवेशनानंतर सर्व संबंधित शेतकरी, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन पाणी प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांना बोलावून बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू. – जयकुमार गोरे, पालकमंत्री

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर