परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना:हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 5 भाविकांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी; VIDEO

परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा सभामंडप कोसळला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. शनिवारच्या गर्दीतच घडली दुर्दैवी घटना यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आज शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली. पाहा घटनास्थवरील फोटो आणि व्हिडिओ घटनेचा व्हिडिओ अडीच तासांनंतर बचावकार्य पूर्ण, ५ जणांचा मृत्यू दरम्यान, यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचावकार्य अडीच तासानंतर पूर्ण झाले असून, सर्व ३२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ३२ पैकी ५ जणांचा मृत्यू तर १८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन विभाग पाथरी, मानवत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक महापालिका परभणी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले. यशवाडी येथील दुर्घटनेतील मृतांची नावे १) संतोष सर्जेराव गडदे, रा. गडदे पांगरा ता. मंठा (मयत), २) आकाश सुरदुसे, परभणी (मयत), ३) मुनेश रामबिलास अग्रवाल वय 26 वर्षे रा.जिंतूर जि.परभणी (मयत) ४) सुरज बाबासाहेब पोपटकर वय 20 वर्षे रा इटोळी ता.मानवत जि.परभणी (मयत) ५) एक अनोळखी मयत वय अंदाजे 45 वर्षे यशवाडी येथील दुर्घटनेतील जखमींची नावे : १) दादाराव रानोजी भांगे २) रामकृष्ण नागोराव बादाडे ३) परमेश्वर पुंडलिक राऊत ४) सौरभ गजानन कोथाळकर ५) केशव गिरी ६) प्रवीण रघुनाथ हलगे ७) गणेश ईकर ८) ओमकार मारुती कोपरकर ९) रामेश्वर रामकिशन गोंडे १०) रामा वेंकटराव होगे ११) अनिकेत संतोष गडदे १२) हनुमंत लिपणे १३) प्रवीण प्रकाश राजबिंडे १४) नारायण दौलत खरात १५) ऋषिकेश कोपरटकर १६) श्रीकृष्ण रुस्तुम भोसले वय १० वर्षे अंदाजे, रा. कुंभारी, ता. जि.परभणी १७) अभिषेक कृष्णा वाघमारे वय १९ वर्ष रा केकरजवळा ता. मानवत १८) भरत रामचंद्र कळसाईतकर वय २० रा. मांडाखळी ता.परभणी यशवाडी दुर्घटना दुर्दैवी- खासदार संजय जाधव परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र यशवाडी संस्थान येथे बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेवर खासदार संजय जाधव यांनी दुःख व्यक्त केले आहे. शनिवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमध्ये या घटनेत सुमारे ३० ते ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले. जखमी भाविकांना तातडीने उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व्यक्त करत प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवून सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही संजय जाधव यांनी केले आहे. बाधित भाविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – आमदार डॉ. राहुल पाटील मानवत तालुक्यातील यशवाडी संस्थान येथे मारोती मंदिराच्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असल्याचे म्हटले. दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याच्या सूचना दिल्याचे सांगत या कठीण प्रसंगी बाधित भाविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास डॉ. राहुल पाटील यांनी दिला. युद्धपातळीवर बचावकार्य, 30 हून अधिक जण अडकल्याची भीती अचानक छत अंगावर कोसळल्यामुळे 30 पेक्षा जास्त भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे आपल्या संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संजय जाधवांकडून प्रशासनाला सूचना यशवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी भाविकांना तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखाची आर्थिक मदत यशवाडी येथील हनुमान मंदिरातील दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. हे ही वाचा.. रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना: छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या बेपत्ता असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!