ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात गोंधळ:पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण, नारळफेक आणि हुल्लडबाजीमुळे वाद चिघळला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूरमधील जोतिबा मंदिर येथे भाविकाना पुजाऱ्यांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जोतिबा मंदिर येथे भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादामागे दोन वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात गुलाल उधळताना काहींनी नारळ फेकून मारल्याचा प्रकार घडला. या कृत्यामुळे काही भाविकांना त्रास झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. काहींच्या डोक्यालाही नारळ लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने काही हुल्लडबाज तरुणांनी यात्रेदरम्यान गोंधळ घातल्याचेही समोर आले. आरतीच्या वेळी गोंधळ घालणे, पुजाऱ्यांवर गुलाल फेकणे आणि त्यांच्या पारंपरिक टोप्या उडवण्याचे प्रकार करण्यात आले. यामुळे पुजारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. याचे रुपातंर मारहाणीत झाले. मात्र, भाविकांना नेमकी मारहाण कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एक एप्रिलला होणाऱ्या मुख्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने भाविकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पुजाऱ्यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे, तर काहींनी धार्मिक स्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर