ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील ‘प्रेम त्रिकोण’ ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि आरोपी अनुराग यादव हे दोघेही एकाच मुलीच्या संपर्कात होते. यातूनच त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री जोहरानला इन्स्टाग्रामवर एक कॉल आला. “मी मित्राला भेटून येतो,” असे घरच्यांना सांगून जोहरान बाहेर पडला. मात्र, तो कॉल प्रत्यक्ष भेटीचा नसून मृत्यूचा सापळा होता, याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. भरमैदानात रक्ताचा खेळ वाजपेयी नगरातील अशरफी मशिदीजवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात जोहरान पोहोचला. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीने गाठ घालून त्याच्यावर हल्ला चढवला. अनुरागने धारदार शस्त्राने जोहरानच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जोहरानचा आक्रोश रात्रीच्या शांततेत विरून गेला. नागरिकांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात हलवले, मात्र जखमा इतक्या खोल होत्या की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासाचा वेग या घटनेनंतर कळमना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोहरानच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अनुराग यादवच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमाच्या त्रिकोणातून हा हत्येचा कट रचला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. चिंतेची बाब कमी वयातील मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर यामुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील तांत्रिक धागेदोरे (Social Media Chats) तपासत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात प्रेयसीवर हल्ला नागपूरसोबत दुसरीकडे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रूरता समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. लग्नाचे बोलणे फिस्कटल्याच्या रागातून हा रक्ताचा खेळ खेळला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवून आरोपी दिलीप राठोडला बेड्या ठोकल्यात. नसरापूर येथे लहान मुलीवर झालेला अनन्वीत अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्याकांडानंतर हा नवीन प्रकार समोर आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा थरकाप उडालाय. नेमके काय घडले? आरोपी दिलीप राठोड (२२) आणि पीडित तरुणी एकाच मॉलमध्ये कामाला होते. याच दरम्यान त्यांच्यात ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरत असल्याचे समजताच दिलीप संतापला होता. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने थेट तिच्या घरात प्रवेश केला. शब्दाला शब्द वाढला आणि रागाच्या भरात दिलीप कडून तिच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार करण्यात आले. तरुणीवर उपचार सुरू हल्ला झाल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरलेला असल्याने तिला नीट ओरडताही येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कमालीचे धैर्य दाखवत आपल्या भावाला फोन केला. “दादा, मला एका मुलाने मारलंय, गळ्यातून आवाज येत नाहीये, तू लवकर घरी ये…” इतके बोलून तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. समोर आपली बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पाहून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर