ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

विरोधकांचे 6 पानी पत्र ‘AI’ निर्मित!:चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दिनांक 20 जून) सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी याहीवेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि त्यावर सरकारच्या वतीने योग्य उपाययोजना अशा पद्धतीचे नियोजन करणे हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकला. ते आले असते तर चर्चा झाली असती. पण त्या ऐवजी त्यांनी आम्हाला 6 पानांचे पत्र दिले आहे. यावेळी पत्रावर सह्या दिसत आहेत. तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की त्यांनी आधीच सगळ्यांच्या सह्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर 6 पानांचे पत्र जोडले आहे. हरकत नाही. विरोधकांनी पाठवलेले पत्र एआय निर्मित पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जर हे पत्र पाहिले, तर लक्षात येईल की हे पत्र एआयच्या मदतीने तयार केले आहे. म्हणजे पत्रही तयार करण्यासाठी आता विषय राहिले नाही, कल्पकता राहिली नाही, किंवा प्रश्नांचे आकलन राहिले नाही. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की ते टेक्नॉलजीचा उपयोग करत आहेत. आपण सर्वांनीच याचा उपयोग केला पाहिजे. येणारी आव्हाने लक्षात घेत विरोधकांनी आतापासूनच तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केला. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. अल निनोला देखील आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले. कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे सुद्धा त्यांनी चॅटजीपीटीला विचारले असते तर अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांनी केले नसते. आपण पाहिले असेल की भासकारराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. कालच बघितले असेल की आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भासकाररावांनी त्यांचेच ऑपरेशन तुडवा करून टाकले. आमच्यासाठी कर्जमाफी राजकीय विषय नाही एकूणच या पत्रकार परिषदेत कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकले नाहीत. त्यांच्या पत्रातही एक पॅराग्राफ असा आहे तो पॅराग्राफ आधीपासून तोच आहे. म्हणजे त्यावर चर्चा झाली, कारवाई झाली तरी ते अजूनही तेच टाकतात. कारण लोकांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाहीत. आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात सुतोवाच केला आहे. मी आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की समोर कोणत्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. आमच्यासाठी कर्जमाफी राजकीय विषय नाही. आमच्यासाठी कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची ताकद आली पाहिजे, अशा दृष्टीने आम्ही त्याकडे पाहतो. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार यापूर्वीची जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती, तेव्हाही मी सांगितले होते की, कोणत्याही कर्जमाफीने कुठलाही शेतकारी श्रीमंत झाला नाही. पण परिस्थितीनुसार आपल्याला कर्जमाफी करावी लागते. यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिले होते की शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉन्ग टर्मच्या उपाययोजना बँकिंग सिस्टमवर होणार परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करून रिपोर्ट द्यावा आणि त्यानंतर आपण काही निकष यात टाकले आहेत. आज आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अल निनोमुळे पाऊस लांबला देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अल निनोमुळे पाऊस लांबला आहे. जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर सरासरी पेक्षा 80 टक्के पाऊस कमी पडला आहे. मराठवाड्यात पाऊस कमीच पडतो. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आत्ता जे काही हवामान विभागाने आज आपल्याला माहिती दिली आहे, कोकणात 23 जून पासून पावसाचा जोर धरेल. विदर्भ किंवा मराठवाड्यात कमी पाऊस असणार आहे. पेरणी लायक पाऊस अद्यापतरी सर्वदूर दिसत नाहीये. त्यामुळे आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही सूचना देत आहोत, त्यानुसार म्हणजे 100 मीमी पाऊस जमिनीत जातो, त्यानंतरच पेरण्या करणे हे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण सगळ्या सूचना शेतकऱ्यांना देत आहोत. पाणीसाठा देखील सध्या मर्यादित आहे. राज्यात एकूण 24 टक्के पाणीसाठा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर