मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अभिमानास्पद लढत दिल्याचा दावा केला आहे. ठाकरे बंधूंनी सगळीकडेच खूप चांगली लढत दिली. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण भाजपने अमाप पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली, असे त्या म्हणाल्यात. आम्ही उद्यापासून पक्षबांधणीच्या कामाला लागणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. मनसेच्या मुंबई विजयी उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला यांनी भाजप व शिंदे गटाचा विजय पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीने कल्याण डोंबिवली येथील आमच्या दिसतील त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून नेले. त्यानंतरही आमचे 5 उमेदवार तिथे निवडून आले. त्यांनी पैसे ओतले, माणसे चोरली, त्यानंतरही आम्ही नवी मुंबईत खाते उघडले. त्यामुळे मला अभिमान आहे. आमची अशीच घोडदौड सुरू राहील. सत्ताधाऱ्यांची एकमेकांवरच चिखलफेक त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांवरच आरोप – प्रत्यारोप करत आहेत. भाजपने पहिल्यांदा अजित पवारांच्या फायली आम्ही अजून बंद केल्या नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांनाही सोबत घेतले. लोकांनी डोळे उघडले पाहिजे. हे सत्ताधीश लोक निवडणुकीत एकमेकांविरोधात काय बोलत होते यावर लक्ष दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुमच्याविरोधात पुरावे आहेत, पण मी सत्ता उपभोगतो तोपर्यंत मी ते देणार नाही असा हा प्रकार आहे. आम्ही खूप चांगली लढत दिली शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे व आमच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन करेन. आमचे शून्य नगरसेवक होते. ठाकरे गटाचे त्यांनी 60-65 नगरसेवक पळवून नेले होते. त्यांच्याकडे केवळ 20 उरले होते. त्यानंतर आमचे आज 6 नगरसेवक निवडून आले, तर ठाकरे गटाचेही 65-66 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवावे लागते. तेवढे धान्यच आम्ही पुरवले. याऊलट विरोधकांकडे मिसाईल्स असूनही चांगली लढत दिली. अरे तुम्ही तुमची माणसे तयार करा ना ठाण्यात मनसेची एकही जागा आली नाही. शर्मिला यांनी त्यावरही भाष्य केले. ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या काही उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले. तिथेही आमचेही उमेदवार पळवण्यात आले. शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष पळवले. अरे, तुमचे पक्ष एवढ्या वर्षांचे आहेत ना. तुम्ही तुमची माणसे का तयार करत नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आता आमचे हे नगरसेवक निवडून आलेत. उद्यापासून आम्ही आमची पक्षबांधणी सुरू करणार. आमच्याकडे पुढची फळी पुढे यायला तयार आहे. काम करायला. आम्ही ते तयार करणार आणि असेच लढणार, असे शर्मिला म्हणाल्या. महायुतीच्या पैशांपुढे आम्ही कुठेच नव्हतो अनेक ठिकाणी आमच्या जागा फार कमी मतांनी पडल्या. महायुतीकडे अमाप पैसा होता. त्या तुलनेत आम्ही कुठेही नव्हतो. कमळाच्या पाकिटातून पैसे वाटण्यात आले. शिंदे भाजपच्या लोकांना पकडत होते. भाजप शिंदेंच्या लोकांना पकडत होते. ते एकेका मताला 5 ते 10 हजार रुपये देत होते. आम्हाला तसे करायचे नाही. आम्हाला पैसे वाटून मतदान करायचे नाही, असेही शर्मिला ठाकरे यावेळी बोलताना म्हणाल्या.
ठाकरे बंधूंनी खूप चांगली लढत दिली:राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचा दावा; भाजपवर पैसे ओतून, माणसे चोरून इलेक्शन जिंकल्याचा आरोप
-
By सुरेश पाचभाई
- January 17, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मुंबईच्या गोरेगावात दोन गटांत राडा:पोलिसांची आरोपींच्या घरावर...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 6, 2026
कॉंग्रेसला कळायला पाहिजे:महाराष्ट्रात नंतर काय त्रास होईल,...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 6, 2026
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी:रवी...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 6, 2026
सुप्रिया सुळे भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र:सुनेत्रा पवारांच्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 6, 2026
