ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

खारपाणपट्ट्यात महिलांचा सेंद्रिय शेतीकडे कल:टाकरखेडा संभू येथे नारीशक्तीकडून 200 लिटर दशपर्णी अर्क तयार, कुुटुंबाचाही सहभाग‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने भातकुली तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत महिला शेतकरी गटांचा सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातील ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतून खारपाणपट्ट्यातील महिला शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे मोर्चा वळवला असून, टाकरखेडा संभू येथील नारीशक्ती हरितक्रांती महिला शेतकरी गटाने कपाशी पिकासाठी तब्बल २०० लिटर दशपर्णी अर्क घरच्या घरी तयार केला आहे. भातकुली तालुक्यातून या स्पर्धेसाठी तब्बल ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नारीशक्ती गटाच्या निमंत्रक पौर्णिमा सवाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येत ३ जून रोजी हे नैसर्गिक कीटकनाशक तयार केले. हा अर्क तयार करण्यासाठी महिलांनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या १० वनस्पतींच्या पाल्यांचा वापर केला आहे. त्यामध्ये कडूनिंब, सीताफळ, धोत्रा, निरगुडी, रुई, पपई, रायमुनी, गुळवेल, लाल कन्हेर, करंज वनस्पतींचा समावेश होता. २ किलो हिरवी मिरची, १ किलो लसूण, ५ किलो गूळ, ५ लिटर गोमूत्र वापरले. हे सर्व साहित्य २०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ४० दिवस सावलीत ठेवले जाते. सध्या गटातील महिला सदस्य दररोज आळीपाळीने दिवसातून दोन वेळा हे मिश्रण ढवळण्याचे काम करत आहेत. ४० दिवसांनंतर हे द्रावण गाळून फवारणीसाठी योग्य होईल. दशपर्णी अर्क हे प्रभावी नैसर्गिक कीटक, बुरशीनाशक मानले जाते. पिकांवर कीड येण्यापूर्वीच याची फवारणी केल्यास प्रादुर्भाव रोखता येतो. यामुळे रासायनिक किटकनाशकांवर होणारा खर्च वाचणार असून, पर्यावरणपूरक शेतीला गती मिळणार आहे. महिलांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन घरातील मुलांनीही निंबोळ्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना डिजिटल शेती शाळा, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. या यशस्वी उपक्रमात पौर्णिमा सवाई, संगीता नाचनकर, जयश्री लाळे, कुसुम मेश्राम, पूजा शेंडे,छाया सवाई, अरुणा लाळे, पुष्पा जामठे, उज्वला पिंगळे, वृंदा मानकर,सुशीला मेश्राम या महिला शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न ^शेतकऱ्यांनी समूहाने एकत्र येऊन शेतीचा खर्च कसा कमी करावा आणि अडचणींना सामोरे जात शेतात ‘एसओपी’ (प्रमाणित कार्यपद्धती) राबवून पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, हाच पाणी फाउंडेशन फार्मर कपचा मुख्य उद्देश आहे. प्रशांत देवळे (पाणी फाउंडेशन टीम)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर