ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार:दोन्ही नराधमांना अटक, ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल; कल्याणमधील संतापजनक घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी घरात घुसून हे घृणास्पद कृत्य केले. मात्र, परिसरातील जागरूक शेजाऱ्यांना या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कोळशेवाडी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सलीम शेख व अख्तर मणियार या दोन्ही आरोपींना पीडितेच्या घरातूनच रंगेहात ताब्यात घेतले. या भयंकर प्रकारामुळे सध्या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. अशा विकृत नराधमांना थेट फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी यावेळी केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि पोलिसांचे कोणतेही ठोस धोरण नसून, ‘देवाभाऊंच्या’ राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये देऊन केवळ मतांचे राजकारण केले जात आहे. मात्र बहिणींच्या सुरक्षेबाबत प्रशासन पूर्णपणे उदासीन असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा गंभीर घटना घडल्यानंतर राजकीय नेते केवळ स्वतःचा स्वार्थ आणि राजकारण साधतात, असा संतापही लोकांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची तत्काळ दखल घेत कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर