ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण:पुढील सुनावणी 20 तारखेला, निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज- न्यायाधीश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची दाट शक्यता होती; मात्र “निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांच्या अवधीची गरज आहे, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने या संवेदनशील खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या 20 जून रोजी निश्चित केली आहे आज सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, तेव्हा पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह न्यायालयात उपस्थित होते. तसेच, या घटनेत मृत झालेले पवनराजेंचे चालक समद काझी यांचे कुटुंबही न्यायाच्या आशेने मुंबईत दाखल झाले होते. मात्र, न्यायाधीशांनी निकालासाठी पुढील तारीख दिल्यामुळे दोन्ही कुटुंबांची प्रतीक्षा आणखी ताणली गेली आहे. यापूर्वी 14 मे रोजी झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी वैद्यकीय कारणास्तव मुदत मागितली होती. 2006 मध्ये झाली होती हत्या राजकीय वैमनस्यातून 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा थरार घडवला होता. सीबीआयच्या तपासांनुसार, ही हत्या 25 लाखांची सुपारी देऊन घडवून आणली गेली होती आणि यामध्ये राज्याचे माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या खटल्यात डॉ. पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशातील बसपा नेते कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन असे एकूण 9 आरोपी आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर आहेत. धाराशिव पोलिस हायअलर्टवर दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात पोलिसांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर गट यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक खबरदारी घेतली जात आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून, सोशल मीडियावरील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी सायबर पोलिस सज्ज आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे 19 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आणि कोर्टाच्या अंतिम निकालाकडे लागले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर