ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

माझा मुलगा दोषी असेल तर नक्की कारवाई करा, पण…:खासदार बजरंग सोनवणे आक्रमक, नाव न घेता धनंजय मुंडेंना मोठा इशारा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आपली बाजू मांडली आहे. “माझा मुलगा किंवा मी स्वतः दोषी असू तर आमच्यावर नक्कीच कठोर कारवाई करा, पण राजकीय हेतूने आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी होत असेल, तर ती सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. हत्या प्रकरणाच्या एफआयआर आणि तपासावर संशय व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, “पोलिसांनी सुरुवातीला मला जेव्हा या प्रकरणाची माहिती (ब्रीफ) दिली, तेव्हा कुठेही माझ्या मुलाचे नाव नव्हते. पहिल्या एफआयआरमध्येही कोणाचे नाव नव्हते. विलास घुलेच्या मृत्यूनंतर अचानक काय घडले? कुठे कट रचला गेला? कोणाचे फोन आले? हे मला माहीत नाही. आधी सोशल मीडिया आणि चौकाचौकात झालेल्या आंदोलनात माझ्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि खासदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. या आंदोलनामागे कोणती डोकी होती, ते कोणत्या गुन्ह्यांत बरबटलेले आहेत, हे मला सगळं माहीत आहे; पण मला सध्या त्या खोलात जायचे नाही.” ते पुढे म्हणाले, “रविवारपर्यंत या प्रकरणात आमचे नाव नव्हते, पण सोमवारी अचानक माझ्या मुलाचे नाव यात गोवण्यात आले. हे का आणि कोणाच्या सांगण्यावरून झाले, हे मला माहीत नाही.” माझा मुलगा घरीच आहे, मी त्याला पळवून लावले नाही तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेत खासदारांनी पोलिसांना निपक्षपाती तपासाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “मी माझ्या मुलाला कुठेही पळवून लावलेले नाही, तो घरीच आहे. पोलिसांनी माझ्या घराचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत, सीडीआर देखील काढले आहेत. खासदार असल्यामुळे माझे सीडीआर काढताना काही कायदेशीर बंधने आहेत, पण मी स्वतः एसपी साहेबांना माझेही सीडीआर तपासण्याची लेखी परवानगी देतो. काय चौकशी करायची ती करा, पण आमची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.” धनंजय मुंडेंचे नाव न घेता सणसणीत टोला या प्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती. यावर बोलताना बजरंग सोनवणे यांनी मुंडेंचा खरपूस समाचार घेतला. पूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोनवणेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा राजकीय सूड उगवला जातोय का? या प्रश्नावर ते म्हणाले, “माझ्यावर सूड उगवणारे कोण आहेत? त्यांना काय उगारायचे ते उगारू द्या, मी इथेच आहे. मला यांचे सगळे अंडे-पिल्ले माहीत आहेत. लोकांना कोण पेटवतंय, चिथावणीखोर भाषणे कोण करतंय, हे बीडची जनता जाणते. आमची चौकशी करण्याआधी स्वतःचे रेकॉर्ड बघा. माझी मुले चांगली आहेत, याचे तुम्हाला वाईट वाटते का? तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि बिल आमच्या नावावर फाडाल, तर हे तुम्हाला सोपे जाणार नाही. मी कोण आहे, हे पुढच्या काळात दाखवून देईन.” विरोधी खासदाराचा दबाव पोलिसांवर असेल तर मला आनंदच! सत्ताधारी नेत्यांकडून पोलिस तपासावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात असल्याच्या मुद्द्यावर खासदारांनी उपरोधिक टोला लगावला. “मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. जर सत्तेत असलेला आमदार (धनंजय मुंडे) म्हणत असेल की पोलिसांवर राजकीय दबाव आहे, तर मला माझ्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. सत्तेत असूनही पोलिस तुमचे ऐकत नाहीत आणि विरोधी पक्षाच्या खासदाराचा दबाव घेत असतील, तर मला याचा नक्कीच आनंद आहे,” असे म्हणत सोनवणेंनी मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केजमधील या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर