ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी हस्तकला व्यवसाय व परिसर विकास असोसिएशनने आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेवर हे शॉप सुरू केले जाणार आहे ती जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची असतानाही, प्रादेशिक विभागाला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. अजिंठा लेणी परिसरात वाढते प्रदूषण, अनधिकृत मानवी हस्तक्षेप आणि मुख्य लेणीतील भित्तिचित्रांचे संवर्धन लक्षात घेऊन प्रशासनाने एक ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार २००२ मध्ये लेणीच्या पायथ्याशी असलेली सर्व दुकाने सुमारे ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या टी-पॉइंट परिसरात स्थलांतरित करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन प्रशासनाला सहकार्य करत स्थानिक हस्तकला विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांनी आपले व्यवसाय २००२ साली चार किमी दूरवर आमची दुकाने स्थलांतरित करण्यात आली. आणि आता पुरातत्त्व विभागच तेथे पुन्हा दुकाने सुरू पाहत आहेत. परवानगी मागितली नाही ती जागा एमटीडीसीची असताना भारतीय पुरातत्त्व विभागाने आमच्याकडे परवानगी मागायला हवी होती. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तेथे शॉप सुरू केले जात होते. आम्ही त्यांना याबाबत जाब विचारला असून अद्याप त्यांचे लेखी उत्तर आलेले नाही. सध्या आम्ही तेथील काम थांबवले आहे. – योगेश निरगुडकर, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी नवीन संकल्पना आहे या ठिकाणी विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दिल्ली येथील एका एजन्सीला सुव्हेनिअर शॉप सुरू करण्याची परवानगी दिली आहे, परंतु व्यापारी याला विरोध करत आहेत. व्यापाऱ्यांनी नवीन संकल्पनासुद्धा आत्मसात करायला हव्यात. – मनोज पवार, संरक्षण सहायक अधिकारी, पुरातत्त्व विभाग

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर