ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

‘नो युवर डॉक्टर’ क्यूआर कोडने ओळखा खरा डॉक्टर!:बोगस डॉक्टरांविरुद्ध सरकारची कठोर पावले; विधानसभेत मंत्री हसन मुश्रीफांची माहिती

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ (Know Your Doctor) ही क्यूआर कोड (QR Code) आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असून, हा कोड स्कॅन करताच संबंधित डॉक्टर अधिकृत नोंदणीकृत आहे की नाही, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यात 1.40 लाख नोंदणीकृत डॉक्टर; बोगस डॉक्टरांवर करडी नजर सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात सध्या सुमारे 1 लाख 40 हजार नोंदणीकृत डॉक्टर सेवा देत आहेत. तसेच, दरवर्षी सुमारे 12,824 नवीन डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात दाखल होत आहेत. मात्र, एमबीबीएस, पदव्युत्तर शिक्षण, आयुर्वेद (BAMS), होमिओपॅथी (BHMS), युनानी किंवा दंतचिकित्सेची कोणतीही अधिकृत नोंदणी न करता जे व्यवसाय करतात, त्यांना ‘बोगस डॉक्टर’ ठरवले जाते. राज्यात 2015 ते 2026 या काळात अशा बोगस डॉक्टरांवर 89 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ‘कलकत्त्याहून आलेल्या डॉक्टरांवर टास्क फोर्स नेमून कारवाई करा’ या चर्चेत भाग घेत शिवसेना (उबाठा) आमदार राहुल पाटील (परभणी) यांनी मराठवाडा आणि विदर्भातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “कलकत्त्याहून आलेले अनेक बोगस डॉक्टर (बंगाली डॉक्टर) ग्रामीण भागात चक्क इमारती बांधून प्रॅक्टिस करत आहेत. हे डॉक्टर रुग्णांना सर्रास स्टिरॉइड्स (Steroids) देतात. नर्सिंग ॲक्टअंतर्गत यांचे रजिस्ट्रेशन तपासले गेले पाहिजे. या डॉक्टरांना पायबंद घालण्यासाठी शासनाने विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करून कठोर कारवाई करावी.” या चर्चेत आमदार राहुल कुल यांनीही उपप्रश्न विचारले. 50 लाखांचा दंड आणि 10 वर्षांच्या कारावासाची तरतूद आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी बोगस डॉक्टरांवरील कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले. बोगस वैद्यकीय व्यवसाय रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्यांची पुनर्रचना करून त्यात आता लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाईल. नॅशनल मेडिकल कमिशनच्या शिफारशीनुसार बोगस व्यवसाय करणाऱ्यांना 1 वर्षाचा कारावास किंवा 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अधिनियमांतर्गत 2 वर्षांपर्यंत कारावास आणि गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास थेट 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. तसेच, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर ‘पीसीपीएनडीटी’ (PCPNDT) कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून कठोर कारवाई केली जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर