ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे:कमवा आणि शिका योजनेतून दरमहा 2 हजारही मिळणार, मंत्री पाटील यांची घोषणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार मानधन देण्याचीही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आज कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत कराटे प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास 1 हजार मुलींना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी आम्ही एक नवा प्रयोग केला. त्यात 50 शाळांमधील 36 हजार मुलींना दर आठवड्याला शनिवारी 1 तास कराटे व ज्युडोचे प्रशिक्षण दिले. त्यातील 15 हजार 400 मुलींना आज आम्ही पहिला यलो बेल्ट दिला. त्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावे लागेल ते प्रशासन देईल. येत्या जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठ्याकाठ्याचे प्रशिक्षण मिळेल. सद्यस्थितीत राज्यातील विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या 5 लाख मुलींना सध्या कॉलेज फी लागत नाही. वसतिगृह शुल्क लागत नाही. याशिवाय त्यांना कमवा व शिका योजनेंतर्गत दरमहा 2 हजार रुपयांचे मानधनही देण्यात येईल, असे ते म्हणाले. यावळी खासदार विशाल पाटील यांच्यासह आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह इतर अधिकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. माझे म्हातारपण सुखरूप जाईल हा विश्वास – खासदार पाटील खासदार विशाल पाटील यांनी यावेळी मुलींचे मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून आपल्याला समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. मला दोन मुली आहेत. मुलींचे हे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल असा विश्वास वाटतो, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकूण उपस्थितांत एकच हशा पिकला. हे ही वाचा… संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला दिलासा:जयराम चाटे 14 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर येणार; भावाच्या तेराव्याला उपस्थित राहणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जयराम चाटे नामक आरोपी तब्बल 14 महिन्यानंतर काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. कोर्टाने त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची विशेष परवानगी दिली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर