ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट:बार्शी तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उन्हामुळे बाष्पीभवन वाढले, उपशासाठी दररोज दोन तास परवानगी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सध्या पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, तीव्र उन्हामुळे तळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तळ्यातील पाणी दररोज केवळ दोन तास उपसा करण्याची परवानगी दिली आहे. त्यातच विजेच्या काही अडचणी निर्माण झाल्या तर मिळाणाऱ्या दोन तासांतील पाणी देखील मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करावे लागत असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. तर सध्या शेतात असणारे ऊस पीक हे पाण्याअभावी व उन्हामुळे जळून जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लवकरात लवकर समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करावे लागत असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. पाण्याअभावी पिके करपून जाण्याची शक्यता ^पाऊस उशिरा होत असल्याने पेरणीची चिंता आहे, त्यातच पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पंप दोनच तास चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतातील जी पिके आहेत, ती पाण्याअभावी व उन्हामुळे करपून जाण्याची शक्यता आहे. धन्यकुमार मोरे, शेतकरी, साकत मध्यम प्रकल्प येथील पाणी पातळी खूप कमी ^पिंपळगाव ढाळे मध्यम प्रकल्प येथील पाणी पातळी खूप कमी झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे, ते पाणी जनावरांना पाण्याची सोय व्हावी तसेच पिण्यासाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी कृषी पंप दोनच तास चालू राहावे, यासाठी वीजपुरवठा होणार आहे. – विराज परदेशी, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, बार्शी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर