ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

शिर्डीतील रेल्वेस्थानकाचा 60 कोटींतून कायापालट:सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल, दोन नवीन फलाट व पाच स्टेबलिंग लाइन उभारणार‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुमारे ६० कोटी रुपये खर्चून स्थानकावर दोन नवीन फलाट आणि पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येणार आहेत. सध्या शिर्डी स्थानकावर तीन फलाट कार्यरत आहेत. नव्या योजनेअंतर्गत चार आणि पाच क्रमांकाचे दोन आधुनिक आयलँड फलाट उभारले जातील. तसेच रेल्वे गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी पाच नवीन स्टेबलिंग लाइन तयार करण्यात येणार आहेत. यामुळे एकाच वेळी अधिक गाड्या हाताळणे शक्य होईल आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल. साईनगर शिर्डी स्थानकावरून सध्या दररोज चार रेल्वेगाड्या सुटतात. विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवीन गाड्या सुरू करण्यास मोठी मदत होणार असून, देशभरातून शिर्डीसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शिर्डी रेल्वेस्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि आधुनिक रेल्वे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. {६० कोटींचा खर्च: प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाकडून भरीव निधीची तरतूद. { क्षमता वाढणार: सध्याच्या ३ फलाटांवरून आता ५ फलाट होणार; एकाच वेळी अधिक गाड्यांचे नियोजन शक्य. { कनेक्टिव्हिटी वाढणार: प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशभरातून शिर्डीसाठी नव्या रेल्वे गाड्या सुरू होणार. शिर्डी स्थानकातून वर्षाला ६ लाखांवर भाविकांचा प्रवास शिर्डी स्थानकातून दरवर्षी ६ लाखांहून अधिक साईभक्त प्रवास करतात. यातून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत सुमारे २० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न जमा होते. सध्या शिर्डीहून आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसह मुंबई, नवी दिल्ली, भोपाळ, झांशी, भुवनेश्वर आदी शहरांसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने सुविधा वाढविण्याचे नियोजन सुरू केले आहे. सिंहस्थ काळात उपलब्ध रेल्वे सेवा दुपटीने वाढविण्याची तयारी करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर