ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मृग नक्षत्र कोरडे:सांगोला तालुक्यात 30 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या, 40 हजार हेक्टरचे नियोजन कोलमडले; फळबागांसह ऊस पिके संकटात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची पेरणीपूर्व तयारी पूर्ण करून ठेवली असली तरी पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे आता २२ जूनपासून सुरू झालेल्या आद्रा नक्षत्राकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. यंदा कृषी विभागाने तालुक्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणीला सुरुवातच होऊ शकलेली नाही. गेल्या वर्षी जून महिन्यातच जवळपास ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सांगोला तालुका कायमच कमी पर्जन्यमानाचा असल्याने खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. सध्या अनेक शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पेरणीसाठी आवश्यक ओलावा नसल्याने ही सामग्री गोदामातच पडून आहे. पाऊस आणखी लांबल्यास दुबार मशागतीचा खर्च वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्याची पाणीपातळी झपाट्याने घटत असून जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आता अधिक तीव्र झाली आहे. तालुक्यात डाळिंब क्षेत्र घटल्यानंतर गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र यंदा उन्हाळा लांबल्याने आणि पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी ऊस पिवळसर पडू लागला आहे. ठिबक सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही पाण्याची ^जून संपत आला तरी अद्याप पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. डाळिंबीनंतर आम्ही ऊस लागवड केली, परंतु पाण्याअभावी तो सुकून जाऊ लागला आहे. पेरणीसाठी तसेच ऊस व इतर फळ पिकांसाठी पाऊस लवकर येणे अत्यंत जरुरीचे आहे. – संतोष खंडागळे, ऊस उत्पादक शेतकरी, ^सांगोला तालुक्यात खरिपाचे सरासरी ३० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी खरिपाचे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पावसाअभावी आतापर्यंत फक्त २ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी जून अखेर सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पावसाअभावी यावर्षी पेरणी लांबणार आहे. – दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला. तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या ८२ गावांच्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून सध्या मागणीनुसार २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे, त्या ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कमलापूर, कोळा आणि चिंचोली या तीन गावांमध्ये सध्या सात टँकरद्वारे दररोज सुमारे साडेतेरा खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. जूनअखेरपर्यंतही पाऊस न झाल्यास आणखी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. जाणवत आहे. उसाबरोबरच डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, आंबा यांसारख्या फळबागांनाही फटका बसू लागला आहे. विहिरींची पाणीपातळी घटल्याने बागांना आवश्यक पाणी देणे कठीण होत आहे. काही ठिकाणी फळगळ सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर