ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगावातील मार्डी चौक–सरकारी दवाखाना मार्गावरील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : स्कूल बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव शहरात घडली. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मार्डी चौक ते सरकारी दवाखाना दरम्यान श्रीराम किराणा दुकानासमोर घडली. या प्रकरणी स्कूल बस क्रमांक एमएच-२९-बीई-१२७४ च्या चालकाविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात रमेश दादाराव मेश्राम (वय २६, रा. डोंगरगाव (वेगाव), ता. वाणी) याचा मृत्यू झाला. याबाबत मृतकाचे वडील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश मेश्राम हा मित्राच्या हिरो मोटारसायकल क्रमांक एमएच-२९-५४५१८ वरून मारेगावकडे गेला होता.

दरम्यान, मार्डी चौक ते सरकारी दवाखाना मार्गावर श्रीराम किराणा दुकानासमोर स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपघातात रमेशच्या चेहऱ्यावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर नागरिकांनी जखमी रमेशला मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, स्कूल बस चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या अपघातास चालक जबाबदार असल्याचे नमूद करीत दादाराव मेश्राम यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

फिर्यादीच्या जबाबावरून तसेच शासकीय रुग्णालयातून प्राप्त झालेल्या डीडी मेमोच्या आधारे मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जुनेद शेख करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर