ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

‘विरोधी पक्षाचा आमदार म्हणून जनतेलाच शिक्षा’:कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- ‘लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक पद्धत!’

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. “लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील जनतेलाच ब्लॉक करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. ‘आमदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी जनता सर्वांचीच असते’ कैलास पाटील म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेताना ‘ममत्वभाव न बाळगता काम करेन’ अशी शपथ घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे आणि निधी रोखला जात असल्याचे चित्र दिसत आहे. “आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता एका पक्षाची नसते. सत्ताधाऱ्यांना मतदान करणारे नागरिकही तिथेच राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण जनतेलाच विकासापासून दूर ठेवणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. ‘विरोधकांना निधीच द्यायचा नाही, हेच सरकारचे धोरण’ राज्यातील सध्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, यापूर्वीही अनेक सरकारे आली आणि विरोधी पक्षही होते. मात्र, आजच्या सरकारने विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार, नगरसेवक आणि सरपंचांना निधीच मिळू नये, अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. “यंत्रणा आणि विकासनिधीचा वापर करून विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधी अडचणीत कसा येईल, याचेच नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. कुठेही हालचाल करता येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘शिवसेना आणि शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणं हीच माझी भूमिका’ आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना कैलास पाटील म्हणाले की, ते अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. “मला जिल्हा परिषद आणि दोन वेळा विधानसभेत जाण्याची संधी केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे ज्यांनी मला शून्यातून उभं केलं, त्या पक्षाशी आणि मला निवडून आणणाऱ्या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणं हीच माझी पहिली प्राथमिकता आहे,” असे त्यांनी सांगितले. ‘2022 मध्येच जायचं असतं तर सुरतहून परत आलो नसतो’ पक्षांतराच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “2022 मध्ये अनेक घडामोडी झाल्या. मला पक्ष सोडायचाच असता तर मी सुरतच्या सीमेवरून परत आलो नसतो. त्या वेळी घेतलेली भूमिका आजही कायम आहे. त्यामुळे आता मला कोणी पक्ष सोडण्यासाठी बोलवायलाही येत नाही, कारण त्यांना 2022चा माझा अनुभव माहिती आहे,” असे ते म्हणाले. ओमराजेंशी मैत्री आहे, पण निर्णय ठाकरे घेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातील चर्चांवर बोलताना कैलास पाटील म्हणाले की, त्यांच्याशी वैयक्तिक मैत्री आहे, मात्र राजकारण आणि मैत्री या वेगळ्या गोष्टी आहेत. “ओमराजे आणि माझी जिगरी मैत्री आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतरच त्यांच्या निर्णयाची माहिती मला माध्यमांतून मिळाली. नेमकं काय घडलं, याची माहिती नाही. मात्र यापुढे उद्धव ठाकरे जे आदेश देतील, त्यानुसार आम्ही काम करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. कैलास पाटील यांनी शेवटी पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार करत, “उद्धव ठाकरे जी दिशा ठरवतील आणि जे आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे,” असे सांगितले. संबंधित बातमी वाचा… प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का?:भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका- कैलास पाटील
भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी त्यांनी कृषिमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर