ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

दिवसभरात 32.7 मि.मी. नोंद; रविवारपर्यंत बरसण्याची शक्यता:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह बरसला मुसळधार पाऊस‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात गत २४ तासात ३२.७ अंश सेल्सिअस पाऊस पडल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कुरणखेडसह अन्य काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचले. दरम्यान जिल्ह्यात २८ जूनपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २४ जून रोजी वर्तवली. ही परिस्थिती पेरणीसाठी पोषक असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे लवकरच पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळ्यात अकोल्यातील तापमानाने नवीन उच्चांक गाठले होते. २ मार्च रोजी तर अकोल्यात भारतात सर्वाधिक ३८.५ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पारा ४६ पार झाल्याचे जाणवले. मे महिन्यातही पारा ४५ अंश उर्वरित पान ४ ताशी ४० ते ५० किमी प्रतितास हवेचा वेग राहण्याचा अंदाज जिल्ह्यात रविवारपर्यंत पाऊस पडण्यासह ताशी ४० ते ५० किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजांच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर