ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी:100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, दिग्पाल लांजेकरांकडून कौतुक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटानंतर आता ‘देऊळ बंद 2’ने देखील तब्बल 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या ऐतिहासिक यशानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिग्पाल लांजेकरांची खास पोस्ट प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत प्रवीण तरडे यांचे अभिनंदन केले आहे. ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगत लांजेकरांनी तरडेंच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद ‘देऊळ बंद’ या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्यानंतर आता ‘देऊळ बंद 2’ या सिक्वेलने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली होती. चित्रपटाची कथा, संवाद आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आणि त्यामुळेच चित्रपटाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे. दिग्पाल लांजेकरांनी प्रवीण तरडेंसाठी केलेली पोस्ट.. ‘देऊळ बंद २’ ने १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला, ही बातमी ऐकताना मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा केवळ एक व्यावसायिक आकडा नाही; हा आपल्या मातीतल्या कथांवर, आपल्या मातीतल्या कलाकारांवर आणि आपल्या मातीतल्या प्रेक्षकांच्या भावविश्वावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल परमस्नेही प्रवीण दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रवीण दादा हे नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो मातीचा गंध. त्यांची भाषा मातीची, त्यांचा स्वभाव मातीचा, त्यांची पात्रं मातीची आणि त्यांची कथाही थेट माणसाच्या मनातून उगवलेली असते. ते जे काही करतात, त्यात कृत्रिमपणा नसतो; त्यात घाम असतो, श्रद्धा असते, संघर्ष असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी असते.‘देऊळ बंद २’ ने तेच सिद्ध करून दाखवलं आहे. प्रवीण दादांबद्दल एक आठवण माझ्या मनात कायम जपून ठेवण्यासारखी आहे. ‘मुक्ताई’मध्ये वारकरी परंपरेचा मान राखण्यासाठी प्रवीण दादांनी विनामूल्य भूमिका केली होती. हा फक्त एका कलाकाराचा सहभाग नव्हता; ही त्या परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा होती, संतविचारांविषयीचा त्यांचा आदर होता आणि आपल्या संस्कृतीशी असलेली त्यांची प्रामाणिक बांधिलकी होती. आजच्या काळात, प्रत्येक गोष्टीचे व्यावसायिक मोजमाप होत असताना, प्रवीण दादांनी दाखवलेला हा भाव माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. कारण अशा कृती शब्दांपेक्षा मोठ्या असतात. प्रवीण दादा भेटले की नेहमी एक आपलेपणा जाणवतो. त्यांच्या बोलण्यात रांगडेपणा असतो, पण मनात विलक्षण संवेदनशीलता असते.म्हणूनच ‘देऊळ बंद २’ च्या १०० कोटींच्या यशाचा आनंद माझ्यासाठी केवळ शुभेच्छांचा विषय नाही; तो आपल्या माणसाच्या विजयाचा अभिमान आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आज अशा यशांची गरज आहे. कारण ही यशं सांगतात की आपली भाषा, आपली माती, आपली श्रद्धा, आपले संघर्ष आणि आपले कलाकार यांच्यात अजूनही अफाट ताकद आहे. फक्त ती प्रामाणिकपणे पडद्यावर यायला हवी. प्रवीण दादांनी ही प्रामाणिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आणि याला त्यांच्या अर्धांगिनीची… विदुषी स्नेहलताईंची सार्थ साथ मिळालेली आहे… प्रवीण दादा, तुमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुमचं हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी आहे आणि आमच्यासारख्या सहप्रवाशांसाठी अभिमानाचं आहे. तुमच्या हातून अशीच मातीशी जोडलेली, माणसांच्या मनात घर करणारी आणि मराठी सिनेमाचा झेंडा उंच नेणारी कार्यं सतत घडत राहोत, हीच मनापासून शुभेच्छा. आता सगळं उघड होणार…! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक समोर, दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणाऱ्या घटनांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर