ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; रिमांड प्रक्रियेत आढळल्या गंभीर त्रुटी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी अटकेपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना अनेक चुका केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेताना अटकेचे स्पष्ट कारण दिले नाही, तसेच पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी दोन तास आधी माहिती देण्याचा नियमही पाळला गेला नाही. या त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे अटक आणि त्यानंतरचे सर्व रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार, 16 डिसेंबर 2025 रोजी बावधन पोलीस ठाण्यातील CR No. 523/2025 अंतर्गत झालेली अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश अवैध घोषित करण्यात आले. याचबरोबर पुढील सर्व ताबा आदेशही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शीतल तेजवानीला तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यासाठी 50,000 रुपयांचा वैयक्तिक जामीन (PR bond) आणि तितक्याच रकमेचे जामीनदार सादर करावे लागणार आहेत. या जामिनासोबत न्यायालयाने काही कठोर अटीही घातल्या आहेत. आरोपीने कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करायची नाही, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन द्यायचे नाही, तसेच तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहणे बंधनकारक आहे. याशिवाय, न्यायालयात नियमित हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या एका आदेशात 3 जानेवारी 2026 रोजी पिंपरी पोलिस ठाण्यातील CR No. 806/2019 अंतर्गत झालेली अटक आणि रिमांड प्रक्रियाही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या प्रकरणातही न्यायालयाने सर्व रिमांड आदेश रद्द करत आरोपीला जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीही 50,000 रुपयांचा PR bond आणि तितक्याच रकमेचे जामीनदार देण्याची अट घालण्यात आली आहे. पोलिसांकडून इतका गंभीर हलगर्जीपणा कसा झाला? या संपूर्ण घडामोडीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की, पोलिसांकडून इतका गंभीर हलगर्जीपणा कसा झाला? सुरुवातीपासूनच या प्रकरणातील तपासावर संशय व्यक्त केला जात होता. आता या त्रुटी जाणीवपूर्वक केल्या गेल्या का, यावरही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, बावधन पोलिसांच्या या चुका तेजवानीसाठी फायदेशीर ठरल्या असल्या तरी, पुणे पोलिसांच्या इतर प्रकरणांमध्ये ती अद्याप अटकेत राहण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर