ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

घाईघाईत निर्णय का? महत्त्वाची माहिती समोर:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पवार कुटुंबात अस्वस्थता; अजित पवारांनंतर अवघ्या काही दिवसांत सत्ता बदल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असून, हा क्षण ऐतिहासिक असला तरी त्याला राजकीय तणावाची किनारही आहे. शोकातून सावरत असतानाच सत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या शपथविधी सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर ठेवण्यात आल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जवळीक वाढताना दिसत होती. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन्ही गटांनी आघाडी करून लढवल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, आजच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर या एकत्रीकरणाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय इतक्या घाईघाईत का घेण्यात आला, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना तातडीने विधिमंडळ गटनेतेपदी निवडणे आणि उपमुख्यमंत्री करण्याचा अंतिम निर्णय एनसीपीच्या कोअर टीमने घेतला आहे. काही घटक मुद्दाम दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा पुढे नेत असल्याने, त्याला आळा घालण्यासाठीच ही जलद हालचाल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शपथविधी लवकर करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र ठेवणे, ही भूमिका प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या ज्येष्ठ नेत्यांकडून पुढे आल्याचे बोलले जात आहे. या नेत्यांनीच पक्षाची वेगळी ओळख कायम ठेवण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे ऐक्याच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पक्ष स्वतंत्र ठेवण्याची रणनीती राबवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांचा दावा असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांनी पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांसमोर आपली भूमिका मांडल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी मिळणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय पवार कुटुंबाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. शरद पवार गटात अस्वस्थता या सर्व घडामोडींमुळे पवार कुटुंबात नाराजी असल्याचं चित्रही समोर येत आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार गटात अस्वस्थता आहे, अशी चर्चा रंगली आहे. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र उपस्थित होत्या, मात्र त्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर लगेचच मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शोक, तर दुसऱ्या बाजूला सत्ता दरम्यान, आजच्या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात येणार असून, याबाबतचे अधिकृत पत्र सुनील तटकरे यांनी विधानभवनात दिले आहे. शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. एका बाजूला शोक, तर दुसऱ्या बाजूला सत्ता आणि राजकीय गणिते, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आजचा शपथविधी केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील दिशा ठरवणारा क्षण ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर