ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पोलिओ हा गंभीर आजार, सुरक्षित लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो:पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वसंध्येला सायकल रॅली‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पोलिओ हा गंभीर आजार असून सुरक्षित लसीकरणाद्वारे त्याचा संपूर्ण प्रतिबंध करता येतो. जगभरातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असून, “एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, हीच पोलिओ निर्मूलनाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मनपा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, २८ जून रोजी होणाऱ्या पोलिओ मोहिमेच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या रॅलीचे उद्घाटन महापौर गाडे आणि उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी सायकल चालवत रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीप्रसंगी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपाली बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. साहिल शेख, डॉ. वृषाली आरु, डॉ. दिलीप बागल, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील कटारिया, सायकल असोसिएशनचे चंद्रशेखर मुळे, डॉ. धनंजय कुलकर्णी, सचिन सातपुते यांच्यासह आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सविस्तर माहिती देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या रॅलीत उपमहापौर ॲड. जाधव यांनी स्वतः सायकल चालवत रॅलीत सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांमध्ये पल्स पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती करत प्रत्येक पालकापर्यंत पोलिओमुक्त भारताचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण रॅलीदरम्यान “एकही बालक सुटू नये” या घोषवाक्याने परिसर दुमदुमून गेला आणि पोलिओ निर्मूलनाबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर