ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम शिंदे यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ; भाजपचे सर्वाधित 6 आमदार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. १२ मे २०२६ रोजी मतदान होणार होते, मात्र १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांचेच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ६ जागा आल्या, तर शिंदे गटाने २ आणि अजित पवार गट व ठाकरे गटाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. पक्षनिहाय शपथ घेणाऱ्या सदस्यांची यादी: भारतीय जनता पार्टी (भाजप): प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक). शिवसेना (एकनाथ शिंदे गट): डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट): अंबादास दानवे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): झिशान सिद्दिकी. विधानसभेतील सद्यस्थिती आणि राजकीय गणिते या निवडीमध्ये विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार जागांचे वाटप झाले आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १३१, शिवसेना (शिंदे गट) ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४० सदस्य आहेत. विरोधी पक्षात शिवसेना (ठाकरे गट) कडे २०, काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे १० सदस्य आहेत. यासोबतच समाजवादी पार्टी 2, जनसुराज्य शक्ती 2, राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी 1, राष्ट्रीय समाज पक्ष- रासप 1, एमआयएम 1 जागा, सीपीआय (एम) 1, पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- पीडब्ल्यूपीआय 1, राजर्षी शाहू विकास आघाडी 1 आणि २ अपक्ष आमदार.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर