ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भगवंताची भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नसते- सुदर्शन शर्मा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंताच्या निस्सीम भक्तीमुळे मानवाच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची आवश्यकता नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ध्रुवाचे चरित्र होय, असे प्रतिपादन भागवताचार्य तथा ज्योतिषाचार्य पंडित सुदर्शन शर्मा यांनी केले. ते गोरक्षण रोड परिसरातील दत्त कॉलनी येथील साई मंदिरामागे असलेल्या गोकुळधाम येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्रीमद्भागवत कथेमध्ये हितोपदेश करीत होते. श्रीमद्भागवत कथेमध्ये पं. शर्मा यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विविध दिव्य लीलांचे सुंदर वर्णन केले. ध्रुव चरित्र, कपिलोपाख्यान, अजामिलोपाख्यान तसेच भगवान नृसिंह अवताराच्या कथांचे सविस्तर निरूपण करताना त्यांनी सांगितले की, दृढ श्रद्धा, अतूट विश्वास, निष्काम भक्ती यांच्या बळावर भगवंताची कृपा सहज प्राप्त होते. ध्रुवाने लहान वयात कठोर तपश्चर्या करून भगवंताची कृपा संपादन केली. प्रल्हादाने प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताचे स्मरण सोडले नाही. भगवान नृसिंह अवताराची कथा भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत कोणतेही रूप धारण करू शकतात, हा संदेश देणारी आहे, असे त्यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर