ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा‎, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग‎

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित‎उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण‎‎शेतकऱ्याने संत्रा बाग कायम‎‎ठेवत त्यामध्ये मोरिंगा‎‎(शेवगा) आणि लक्ष्मीतरू‎‎यासारख्या आंतरपिकांची‎‎लागवड केली. या‎‎प्रयोगामुळे त्यांना दरमहा‎‎किमान मजुरी खर्च जाऊन‎‎निव्वळ ४० हजारांचा‎अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती‎जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्र‎काैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत‎शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे‎वरूडपासून जवळच असलेल्या जरूड येथे‎चार एकर शेती अाहे. मागील काही वर्षांत‎हवामानातील बदल, बाजारातील चढ-उतार‎आणि संत्र्याच्या निर्यातीवरील परिणाम पाहता‎त्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून‎संत्रा बागेत आंतरपीक घेतले. त्यांनी संत्रा‎बागेत शेवग्याच्या ‘वलय पट्टी’ प्रकाराची तसेच‎लक्ष्मीतरू, बीट या वनस्पतीचीही लागवड‎केली. या प्रकारात शेंगांपेक्षा पानांचे उत्पादन‎अधिक मिळते. मोरिंगाच्या पानांमध्ये औषधी‎गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली‎मागणी आहे. वर्षातून तीन वेळा पानांची‎कापणी केली जाते. ही पाने सुकवून त्यांची‎पावडर तसेच टॅबलेट तयार करून विक्री केली‎जाते. ऑनलाइन माध्यमातूनही या उत्पादनांची‎खेरडे विक्री करत आहेत.‎ शेवग्याच्या पानांच्या पावडरचे अार्थिक गणित‎ मोरिंगाच्या बिया आणून लागवड करण्यासाठी सुरुवातीला‎फक्त १५ हजारांचा खर्च आला. त्यानंतर वर्षातून तीनदा कापणी‎केली जाते. सुकवलेल्या पानांची पावडर सरासरी किमान २००‎रुपये प्रतिकिलो विकली जाते. आंतरपीक पद्धतीतून पहिल्या‎कापणीत सुमारे एक क्विंटल, दुसऱ्या कापणीत १३० किलो‎आणि तिसऱ्या कापणीत १५० किलो उत्पादन मिळाले. चौथ्या‎कापणीत यापेक्षाही अधिक उत्पादनांची अपेक्षा आहे.‎लक्ष्मीतरू पावडरला ५ ते ७ हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो.‎विशेष म्हणजे त्यांनी ८ ते १० तरुणांनाही रोजगार दिला आहे.‎
आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर