ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंताच्या ‘समाधी चरणी’ केला अर्पण:पद्मश्री जनार्दनपंत बोथे यांनी भावुक होत घेतले दर्शन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारत सरकारच्यावतीने अतिशय प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होताच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचे दिल्लीहून मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गुरुकुंजात आगमन झाले. यावेळी त्यांनी हा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचरणी अर्पण केला. त्यांनी भावुक होत दर्शन घेतले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खासगी सचिव तसेच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे (गुरुजी) यांना भारत सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांना अलिकडेच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थित होते. १९५० च्या दशकापासून जनार्दनपंत बोथे गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समवेत सेवा कार्यात सक्रियपणे सहभागी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार अधिक व्यापक व्हावा, यासाठी गुरुकुंज आश्रमाच्या माध्यमातून बोथे गुरुजींचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. या संपूर्ण कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी यांनी हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी अर्पण केला. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळातील सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांचा हा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रसंताच्या समाधीस्थळी पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, हा पुरस्कार अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक गुरुदेवभक्ताचा आहे. प्रत्येक प्रचारकाचाही आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाला एवढ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे खरोखर मी माझे अहोभाग्य समजतो. त्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभारही व्यक्त केले. दर्शन घेताना पाणावले डोळे,समाधानाचे सुख दिल्लीहून मंगळवारी मध्यरात्री एक वाजताचे दरम्यान बोथे गुरुजींचे गुरुकुंज आश्रम याठिकाणी आगमन झाले. त्यांनी त्याचक्षणी समाधीचे दर्शन घेत हा पुरस्कार समाधी चरणी अर्पण केला. त्यावेळी बोथे गुरुजी हे अतिशय भावुक झाले होते. त्यांचे डोळे अक्षरशः पाणावले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर