ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?:काही जण उघड उघड बोलतायत…, आता हे अधिकृतपणे मान्य करायलाच हवं- अंबादास दानवे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उबाठा गटाचे 7 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहेत. या बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’बाबत आता उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले असून, त्यांच्या या विधानामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. अंबादास दानवे म्हणाले की, काही लोक संपर्कात आहेत तर काही जण आता उघड उघड बोलू लागले आहेत, त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. लोकसभा निवडणुकीपासून दर महिना-दोन महिन्यांनी अशा प्रकारच्या अंतर्गत चर्चा समोर येत आहेत, त्यामुळे आता हे अधिकृतपणे मान्य करायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दानवे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाचे खासदार खरोखरच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का, यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून जनतेचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ते लोकांचे सोशल मिडीयावरील खाते बंद करतात. गेल्या 12 वर्षांमध्ये भाजपने लोकशाही संपवण्याचे काम केले आहे, असे उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर सरकार विरोधात आम्ही रस्त्यावर उतरत अहोत. पण कार्यकर्ते आज एका पक्षात असतात तर उद्या दुसऱ्या पक्षात जातात म्हणून जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असेही दानवेंनी म्हटले आहे.

हा कोणता न्याय? अंबादास दानवे म्हणाले की, मविआ म्हणून विधान परिषद निवडणूक आम्ही लढवत आहोत. बीड-धाराशिव-लातूरची जागा आम्ही ताकदीने लढत आहोत. सत्ताधारी पक्षाने निवडणूक लढण्याचे नवे तंत्र आणले आहे. इलेक्शन नव्हे,सिलेक्शन करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. कोणी निवडणुकीत उभेच राहू नये, जे उभे राहिले त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. तरीही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी मविआम्हणून ताकदीने निवडणूक लढवत आहोत. विधान परिषद निवडणुकीत उमेदवार उभाच राहू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्ये उभ्या असलेल्या उमेदवाराला नोटीस पाठवण्यात आली, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यत जाण्याची तयारी होती असे दानवेंनी म्हटले आहे. राजकीय नेतृत्वांबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष अंबादास दानवे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेचा आक्रोश समोर येत आहे. सर्वच राजकीय पक्ष, नेतृत्व ज्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो सर्वांबद्दल जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. म्हणून जनता अशा पद्धतीने जनता पर्याय शोधते आणि त्यातूनच कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून लोकं असंतोष व्यक्त करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर