ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

प्रगतिशील शेतकरी:शेवग्याच्या पानांपासून दहमहा 40 हजारांचा नफा; वाचा अमरावतीच्या शेतकऱ्याचा प्रयोग

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे वरुडपासून जवळच असलेल्या जरुड येथे चार एकर शेती आहे. मागील काही वर्षांत हवामानातील बदल, बाजारातील चढ-उतार आणि संत्र्याच्या निर्यातीवरील परिणाम पाहता त्यांनी बारामती परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून संत्राबागेत आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. पानाचे उत्पादन अधिक खेरडे यांनी संत्राबागेत मोरिंगाच्या ‘वलय पट्टी’ प्रकाराची तसेच लक्ष्मीतरू, बीट या वनस्पतीचीही लागवड केली. या प्रकारात शेंगांपेक्षा पानांचे उत्पादन अधिक मिळते. मोरिंगाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. वर्षातून तीनवेळा पानांची कापणी केली जाते. ही पाने सुकवून त्यांची पावडर तसेच टॅबलेट तयार करून विक्री केली जाते. ऑनलाइन माध्यमातूनही या उत्पादनांची अजिंक्य खेरडे विक्री करत आहेत. मोरिंगा पावडरचे आर्थिक गणित मोरिंगाच्या पानांची वर्षातून तीन वेळा कापणी करता येते. सुकवलेल्या पानांची पावडर सरासरी किमान 200 रुपये प्रतिकिलो विकली जाते. अजिंक्य यांनी चार एकर क्षेत्रात मोरिंगाची लागवड केली. आंतरपीक पद्धतीतून पहिल्या कापणीत सुमारे एक क्विंटल, दुसऱ्या कापणीत 130 किलो आणि तिसऱ्या कापणीत 150 किलो उत्पादन मिळाले. चौथ्या कापणीत यापेक्षाही अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. लक्ष्मीतरू या वनस्पतीतील औषधी गुणधर्मांमुळे याच्या पावडरला 5 ते 7 हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. अजिंक्य यांनी आपल्या बागेत लक्ष्मीतरूची 54 झाडे लावली. यासोबतच ते संत्राच्या सालेपासून पावडरही तयार करतात. शेतातच प्रक्रिया उद्योग शेतातच उभारला प्रक्रिया उद्योग मोरिंगा तसेच संत्र्याच्या सालींपासून पावडर तयार करून विक्री करण्यासाठी अजिंक्य यांनी शेतातच प्रक्रिया उद्योग उभारला आहे. पाला सुकविण्यासाठी ड्रायरसह इतर आवश्यक यंत्रसामग्रीची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 10 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या युनिटमध्ये पानांचे व सालींचे वाळवण, पावडर निर्मिती, पॅकिंग आणि विक्रीची संपूर्ण प्रक्रिया केली जाते. त्यामुळे उत्पादनाला अधिक मूल्यवर्धन मिळून उत्पन्नात वाढ झाली आहे. (प्रगतिशील शेतकरी अजिंक्य खेरडे यांचा संपर्क क्रमांक 9730068290)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर