ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची दमदार कामगिरी:7 सुवर्ण, 10 रजत, 14 कांस्य पदकांवर खेळाडूंनी कोरेले आपले नाव‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ११ ते १५ जून दरम्यान आयोजित पहिल्या कब क्लास, कॅडेट व सब-ज्युनिअर मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ पदके पटकावली. यात ७ सुवर्ण, १० रजत आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सब- ज्युनिअर मुलींच्या गटात स्वराली वानखेडे आणि मनस्वी सावंग यांनी सुवर्णपदके जिंकली. त्रिशा पटके हिने रजत तर परिधी तायडे हिने कांस्य पदक पटकावले. सब-ज्युनिअर मुलांच्या गटात रुद्र पानकर याने सुवर्णपदक मिळवले. अंश धकाते, अरहम अली खान, अथर्व गवई, सार्थक अंभोरे व शौर्य खाडे यांनी रजत पदके जिंकली. तर अजमल निमसूरवाले, मयंक पवार, आर्यन घुसले, शादाब रेगीवाले व आदर्श खारोडे यांनी कांस्यपदकांची कमाई केली. कॅडेट मुलींच्या गटात निहारिका गनवीर हिने सुवर्णपदक जिंकले. तर रसिका झांबरे, अवनी ठोसर आणि सेलिना चव्हाण यांनी कांस्यपदके मिळवली. कॅडेट मुलांच्या गटात संम्यक वाहूरवाघ, शिबान खान आणि हर्ष बनसोड यांनी सुवर्णपदके जिंकून अकोल्याचा झेंडा उंचावला. यश काटकर याने रजत पदक तर सक्षम संद्री, सय्यद सकलेन, मोईन खान आणि अंगत पटके यांनी कांस्यपदके मिळवली. कब क्लास मुलांच्या गटात अद्वैत वानखेडे, हर्ष यादव आणि सिद्धेश वानखेडे यांनी रजतपदके पटकावली. तर युग गोगलिया याने कांस्यपदक मिळविले. या उल्लेखनीय यशामागे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहायक प्रशिक्षक गजानन कबीर, आदित्य मने, योगेश निषाद आणि सय्यद साद यांच्या अथक परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि खेळाडूंच्या जिद्दीचे हे यश मानले जात आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड स्पर्धेत विशेष चमक दाखवत रुद्र पानकर, स्वराली वानखेडे आणि मनस्वी सावंग यांनी सुवर्णपदके पटकावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या तिन्ही खेळाडूंची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट, प्रशिक्षक गजानन कबीर, योगेश निषाद, आदित्य मने आणि सय्यद साद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर