ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आईने मंगळसूत्र विकून मुलाला बनवले मिस्टर इंडिया:आहाराचा खर्चही भागत नव्हता, पण त्याने फिटनेस आयकॉन बनत आईला दिले कोटीचे घर-गाडी गिफ्ट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात करिअर करू पाहणाऱ्या मुलाला आर्थिक तंगीमुळे पुरेसा आहारही पुरवणे शक्य होत नव्हते. अखेर तिने मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी मंगळसूत्र विकले. यातून मिळालेल्या पैशातून तिने मुलाला आहार पुरवला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत मुलाने पिळदार शरीरयष्टी घडवत २०१९ मध्ये ‘मिस्टर इंडिया’ किताब पटकावला. त्यानंतर मागे वळून न पाहता ७ वर्षांत ६०० स्क्वेअर फुटाच्या छोट्या घरात राहणाऱ्या आईला आज कोट्यवधीचे आलिशान घर, गाडी भेट दिली. विक्रम राजेंद्र जाधव याची ही यशाेगाथा… विक्रम २९ वर्षांचा अाहे. त्याचे फिटनेस क्षेत्रातील काम पाहता भारत सरकारने त्याला देशाचा फिटनेसचा ब्रॅड अॅम्बेसेडर बनवले. विक्रमचा हा संघर्षमय प्रवास तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या व्यक्तीला ब्रॅड अॅम्बेसेडर बनवते. फिटनेस क्षेत्रात विक्रमला हा मान मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी क्रीडा मंत्रालय व क्रीडामंत्री मनसुख मांडविया तसेच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे विक्रमचे नाव सुचवले. त्यानंतर खासदार जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे हा सन्मान मिळाल्याचे विक्रमने सांगितले.
सेलिब्रिटींसह देश-विदेशातील नागरिकांना ऑनलाइन मार्गदर्शन : पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला विक्रम आता फिटनेसचे ऑनलाइन ट्रेनिंग देतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेलिब्रिटींसह देश-विदेशातील नागरिकही ऑनलाइन सराव करतात. छत्रपती संभाजीनगर येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये त्याने अत्याधुनिक स्पोर्ट््स क्लब उभारला आहे. त्यात जलतरण तलाव, जिम, झुंबा डान्स, डायट कॅफे, टर्फ, योगा आदी प्रकार उपलब्ध आहेत. या मध्यमातून त्याने मोठी आर्थिक भरारी घेतली आहे. आहारासाठी दुचाकी विकली होती, आता महिन्याला ३० हजार खर्च एकेकाळी महागाईमुळे पूर्ण आहार मिळवणे विक्रमला कठीण होते. स्पर्धेच्या तयारीसाठी दुचाकीदेखील विकली. त्यातून आहाराचा खर्च भागवला होता. आता तो महिन्याला स्वत:च्या आहारावर सुमारे ३० हजार रुपये खर्च करतो. दिवसभरात १० अंडी, अर्धा किलो चिकन, अर्धा किलो मासे, पालेभाज्या, प्रोटीन, ३ वेळा जेवण असा एका दिवसाचा आहार. आजही अन् भविष्यातही फिटनेसला महत्त्व आजही आपल्या देशात फिटनेसकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांचा सर्वाधिक खर्च आरोग्यावर, रुग्णालयात होतो. तुम्ही मैदानात फिरले, व्यायाम केला तरी व्यक्ती विनाखर्च तंदुरुस्त राहते. जगभरातील खानपान, प्रदूषण, बदलते वातावरण पाहता भविष्यातही फिटनेसच महत्त्वाचा राहणार आहे. मला देशाला पदक जिंकून देणारे खेळाडू घडवायचे आहेत. त्यादृष्टीने माझे नियोजन सुरू आहे. – विक्रम जाधव, फिट इंडिया ब्रँड अॅम्बेसेडर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर