ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

जगावर परिणाम:गॉडझिला एल निनो, 3 महिने देशात दुष्काळसदृश स्थिती, पुराचीही शक्यता, आता जागतिक हवामान संघटनेने दिला इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आयएमडीनंतर आता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) देखील जागतिक हवामानाबाबत एक अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या हवामान संस्थेच्या ताज्या अपडेटनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरात अल निनो तयार होण्याची शक्यता ८०% आहे, तर नोव्हेंबर २०२६ पर्यंत तो टिकून राहण्याची शक्यता ९०% किंवा त्याहून अधिक आहे. अल निनो किमान मध्यम तीव्रतेचा असेल, जो पुढे जाऊन आणखी मजबूत होऊन गॉडझिला अल निनो बनण्याची पूर्ण शक्यता आहे. ‘गॉडझिला अल निनो’ हे हवामानाचे सर्वात भयंकर रूप आहे, जे हवामान बदलासोबत मिळून जगभरात हवामानाची चरम सीमा निर्माण करते. याच्या प्रभावाने ऑस्ट्रेलियापासून भारतासह जगभरात दुष्काळ, विनाशकारी पूर, सागरी आणि जमिनीवरील उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, यापूर्वी २०२३-२४ मधील अल निनो इतिहासातील पाच सर्वात शक्तिशाली टप्प्यांमध्ये समाविष्ट होता, ज्याने २०२४ मध्ये जागतिक तापमानाचे सर्व विक्रम मोडले होते. संभाजीनगर, बीडसह ९ जिल्ह्यांत दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट आगामी दोन दिवस मराठवाड्यात संभाजीनगर,परभणी,बीडसह राज्यातील ९ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा कमी झाला असून राज्यभरात १८ जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशाखाली घसरले आहे. भारताचे ‘दोन रक्षक’, जे एल निनोला हरवू शकतात डब्ल्यूएमओनुसार, एल निनो असूनही भारतात मान्सून वाचू शकतो, जर या दोन प्रणाली सक्रिय राहिल्या. पहिली- इंडियन ओशन डायपोल (आयओडी). याला ‘हिंद महासागराचा एल निनो’ असेही म्हणतात. जर याचा टप्पा ‘पॉझिटिव्ह’ असेल, तर तो एल निनोच्या दुष्काळाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करून भारतात चांगला पाऊस पाडू शकतो. दुसरी- मॅडेन-ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ). हे ढग आणि वाऱ्यांचे एक जागतिक चक्र आहे जे विषुववृत्तावर फिरत असते. जेव्हा ते भारतावरून जाते, तेव्हा कमकुवत मान्सूनमध्येही मुसळधार पावसाची स्पेल (फेरी) घेऊन येते. ४८ तासांचा यलो अलर्ट आगामी २ दिवस नाशिक, जळगाव, अहिल्यानगर , संभाजीनगर, परभणी, बीड, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या आठ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वैशाली खोब्रागडे, हवामान तज्ज्ञ. उत्तर-दक्षिणेत ढगांचे बस्तान नवी दिल्ली | मान्सूनची प्रतीक्षा संपणार आहे. भारतीय हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे की, मान्सून ४ जून रोजी केरळमच्या किनाऱ्यावर धडकू शकतो. यानंतर पुढील एका आठवड्यात तो तामिळनाडू, कर्नाटक आणि दक्षिण भारताच्या इतर भागांत पुढे सरकू शकतो. तसे पाहिले तर केरळममध्ये मान्सून येण्याची सामान्य तारीख १ जून आहे. यापूर्वीच्या अंदाजात विभागाने मान्सून २६ मे रोजी केरळममध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सून ११ दिवसांपासून अडकला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर