ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे:12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी २६ अधिकाऱ्यांचे पथक ५ क्रूझर गाड्यांमधून परभणीत दाखल झाले होते. शहरातील धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी, जनता मार्केटच्या राजकोट स्वीट्सच्या बाजूचे मशिनरी दुकान, नोबल हँडलूम दुकानाजवळ पथकाने धाडी टाकल्या. संशयितांकडून कागदपत्रे, गॅजेट्स, साहित्य जप्त केले. गुप्त मोहीम, मार्किंग कारवाईसाठी वापरलेल्या पाचही क्रूझर गाड्यांवर ए, बी, सी, डी अशा प्रकारची विशेष मार्किंग केली होती. अत्यंत गुप्तता बाळगून आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर