ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पिकअप वाहनातून (एमएच-२९-बीई-८९१५ गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाला मिळाली होती. त्याआधारे गजानन सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचला. तस्करांचे वाहन दिसताच गजानन यांनी त्यांच्या कारने (एमएच-१२-पीटी-८६३४) पाठलाग सुरू केला. मात्र, तस्करांनी वाहन उमरखेडपासून ५ किलोमीटर अंतरावरील सुकळी (ज.) गावाच्या दिशेने वळवले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या कारला वेढा घातला. त्यांना गाडीबाहेर ओढून दगड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. ग्रामस्थ गजानन यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या क्रूर हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तस्करीचे मोठे रॅकेट आणि पूर्वनियोजित कट नागपूर-तुळजापूर महामार्गावरून दररोज रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक चालते. यामागे एक मोठी संघटित आणि क्रूर टोळी सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात तस्करांनी पाठलाग करताना सुकळी गावाकडे जाणीवपूर्वक गाडी वळवणे आणि तिथे आधीच जमावाने तयार राहून हल्ला करणे, यावरून हा अचानक झालेला हल्ला नसून पूर्वनियोजित कट असल्याचा थेट आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आरोपींच्या शोधासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोलीत पथक रवाना या प्रकरणी मृताचा भाऊ ज्ञानेश्वर सुरोशे यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी शेख सुलतान अलावली (रा. सुकळी ज.) आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), १०३ (१), ३ (५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर