ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Samruddhi Accident: सासू-सासरे-सूनबाई-मुलगा-नात सगळे गेले, बदली झाली होती, कुटुंब सोडायला निघालं, काळाने रस…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले. चंद्रपूरवरून अकोलाकडे चारचाकी वाहनाने अमरावतीच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ५ जण जागीच ठार झाले.

मृतकामध्ये महादेव जिवाजी जीवने (६५ वर्षीय) लताबाई महादेव जीवने (६० वर्षीय) भास्कर महादेव जीवने (४३ वर्षीय) आरती भास्कर जीवने (४१ वर्षीय) आणि जीज्ञा भास्कर जीवने (१२ वर्षीय) यांचा समावेश आहे.
चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले, कार थेट कंटेनरला जाऊन धडकली
जीवने कुटुंब अकोल्याच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होते. धामणगाव रेल्वेजवळील चॅनेल क्रमांक १०५ जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. इतक्यात जीवने कुटुंबाचे चारचाकी वाहन त्या लेनवर आली. मात्र चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरला जाऊन धडकली.
एकाच कुटुंबातील पाच जण गेले, चंद्रपुरात शोककळा
घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस व महामार्ग पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताचे वृत्त बाबुपेठ परिसरात पोहोचल्यावर परिसरात शोककळा पसरली.
नवरा- कोळसा खाणीत इंजिनिअर, बायको जिल्हा परिषदेत अधिकारी
भास्कर जीवने सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीत मायनिंग अभियंता होते. त्यांनी १५ दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला होता. सोबतच त्यांची पत्नी आरती शासकीय नोकरीवर असून त्यांची बदली अकोला जिल्हा परिषदेमध्ये झाली होती. तिथला पदभार घेण्यासाठी कुटुंब अकोला येथे निघाले होते. मात्र वाटेतच कुटुंबावर काळाने घाला घातला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर