ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षी रेल्वे स्थानक परिसरातील हत्या प्रकरणाने छत्रपती संभाजीनगर हादरलं होतं. या हत्येतील जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारानं शिल्लेगाव भागात पुन्हा एक हत्या केली. हत्येचा सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन उर्फ ‘मुजीब डॉन’ आणि त्याचा भाऊ सय्यद मोईन सय्यद मोईनोद्दीन हे पसार झाले होते. अखेर पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या. पडेगावच्या अन्सार कॉलनीत लपलेल्या भावांना गुन्हे शाखेने सशस्त्र फौजफाट्यासह छापा टाकून अटक केली.

गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील उड्डाणपुलाखाली एकाची क्रूर हत्या झाली होती. 2 ऑक्टोबर 2025 रोजी इम्रान सय्यद शफिक याच्या हत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. या गँगवार प्रकरणात मुजीबला अटक करण्यात आली होती. तर त्याचा भाऊ सय्यद मोसीन हा पोलिसांना चकवा देत होता. मात्र, पुढे तांत्रिक मुद्द्याचा फायदा घेत मुजीब देखील जामिनावर सुटला होता.

आधी मैत्री, मग थेट लॉजवर नेलं, फोटो काढले अन्…, तरुणाचं भयंकर कृत्य, छ. संभाजीनगरात खळबळ

जामिनावर सुटल्यानंतर देखील शिल्लेगाव भागात झालेल्या क्रूर हत्या प्रकरणात मुजीबचा सहभाग होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, मुजीबने पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पोलिसांचे वाहन दिसताच तो पसार होत होता. 10 दिवसांपूर्वी शिल्लेगाव पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले. मात्र महिलांनी धक्काबुक्की केल्याने पोलिसांना माघारी फिरावे लागले होते.

अखेर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह टीमने सशस्त्र फौजफाट्यासह कारवाई केली. यामध्ये मुजीब याच्यासह त्याचा भाऊ मोईनला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.

मुलांसमोरच वडिलांना संपवलं

गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्क मिल कॉलनी भागात जुन्या गॅस व्यवसायातील वादातून सय्यद इम्रान शफीक (वय 38) याचा खून झाला होता. रिक्षातून जाताना रेल्वे पुलाखाली आडवून मुलांच्या समोरच इम्रानची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 9 तासांत पोलिसांनी मुजीब डॉनसह तिघांना अटक केली होती.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर