ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केले. दरम्यान, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. या प्रवासासाठी सियाला पुण्यातून विमानतळापर्यंत सोडणाऱ्या वैभव जाधव नावाच्या चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सियाबाबत काही धक्कादायक माहिती उघड केली आहे, ज्याचा तपास पोलिस करत आहेत. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रवासासाठी सिया तयार नव्हती आणि ती गाडीत बसायलाही नकार देत होती, अशी माहिती वैभव जाधव या चालकाने दिली आहे. वैभवच्या जबावानुसार, सियाचा भाऊ साहिल याने तिला हाताला धरून जबरदस्तीने गाडीत बसवले होते आणि पुणे ते रावेत (पिंपरी-चिंचवड) दरम्यान प्रवासात त्या दोघांमध्ये तीव्र वादही झाले होते, ज्यातून या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. केतनचा पासपोर्ट सियाने फूडकोर्टवरच टाकला वैभव जाधव याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान किवळे (लोढा) येथून केतन अग्रवाल व त्याच्या कुटुंबीयांना मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना वाटेत एका फूड कोर्टवर नाश्त्यासाठी गाडी थांबली होती. यावेळी सियाने काहीतरी निमित्त करून गाडीकडे परतत त्यातून काही सामान काढून आपल्या खिशात लपवल्याचे वैभवच्या निदर्शनास आले होते. पुढे मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनचा पासपोर्ट गाडीत राहिल्याचे समजले, परंतु प्रत्यक्षात तो पासपोर्ट सियाने फूड कोर्टवरच चोरल्याचे वैभवच्या लक्षात आले होते. सियाने अत्यंत चाणाक्षपणे हा प्रकार केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट या चालकाने केला असून, यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. लोहगडावर गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केल्यानंतर, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासमोर सखोल चौकशी सुरू आहे. ही चौकशी सलग दोन तासांहून अधिक काळ सुरू असून, यातून हत्येच्या कटाबाबत अधिक महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा सियापुढे केतनच्या खुनाचा सीन रीक्रिएट:पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेले, तटबंदीवरून एक डमी फेकून पाहिला परिणाम पुण्यातील हत्या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या घटनेचे प्रात्यक्षिक (सीन रिक्रिएशन) केले. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी पोलिसांनी सिया गोयलला सकाळी साडेसहा वाजता किल्ल्यावर नेले होते. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर