घोडदरा गावावर शोककळा; प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : घोडदरा येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक दादाजी गोविंदा दुमोरे (वय ७२) यांचे गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने घोडदरा गावावर शोककळा पसरली असून, गावातील एक परिचित व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
दादाजी दुमोरे हे सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी घोडदरा येथील स्मशानभूमीत सकाळी १०:३०वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी घोडदरा येथील स्मशानभूमीत सकाळी १०:३०वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.