ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Pune Rain: पुणेकरांनो, पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून ‘धोक्याचा इशारा’, घराबाहेर पडण्याआधी हे व…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: पुणेकरांनो पुढील काही तास घराबाहेर पडताना काळजी घ्या. विकेंड असल्यानं बाहेर फिरण्याचा तुमचा प्लॅन असेल तर त्याआधी वरूणराजाचा प्लॅन नक्की तपासा. हवामान विभागाने (IMD) पुण्यासाठी पुढील तीन दिवसांचा अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. यामध्ये आज (२६ जुलै) पुण्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची तीव्र शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.

आज दुपार आणि संध्याकाळनंतर आकाश पूर्णपणे ढगाळ होऊन जोरदार पावसाला सुरुवात होईल. सकाळपासूनही पावसाची भुरभूर मध्ये मध्ये सुरूच राहील. तर, आकाश मुख्यतः ढगाळ राहील. या पावसामुळे तापमानतही घट होणार असून पुणेकरांना गारवा अनुभवायला मिळेल. पुण्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. .

सोमवारीही दुपारनंतर शहरात हलका ते मध्यम पाऊस राहील. तर, पुण्यातील घाट परिसरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे पर्यटकांनी घाट रस्ते आणि धरणांच्या परिसरात जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाचा हा जोर पुढील 3-4 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

मंगळवारी म्हणजेच 28 जुलै रोजीही शहरात ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळतील. घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ऊस पडण्याची शक्यता कायम राहील. तर, कमाल तापमान २९°C आणि किमान २३°C च्या आसपास असेल.

पुण्यातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आणि प्रामुख्याने घाट परिसरात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे. नदी-नाले आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर