ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

‘ईव्ही’ गाड्यांची डीलरशिप घ्यायला गेला, बांधकाम व्यावसायिक एका चुकीत फसला, शेवटी…, नाशिकमध्ये काय घडलं?

22 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक: सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांत वाढ झाली आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. याच वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी नाशिकमध्ये मोठा गंडा घातला. एका आंतरराष्ट्रीय ईव्ही उत्पादक कंपनीची अधिकृत डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाची मोठी फसवणूक करण्यात आली. त्यांना तब्बल 14 लाख 7 हजार रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकच्या पारिजात नगर येथील गौरव ताराचंद गुप्ता हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांनी गुगलवर डीलरशिपसाठी शोध घेतला. एका कंपनीच्या वेबसाईटवर जात त्यांनी अर्ज केला. मात्र, इथंच ते फसले. संबंधित वेबसाईट ही मूळ कंपनीची नव्हती तर तिच्यासारखीच दुसरी होती.

आषाढीला फराळ वाटप केलं, घरी जाताना शेतकऱ्यासोबत भयंकर घडलं, 5-6 नातलग आले अन्…, नाशिक हादरलं!

गुप्ता यांचा अर्ज आल्यावर सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला. अगदी अधिकृत दिसणाऱ्या मात्र बनावटच असलेल्या ईमेल आयडीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. मनीष परवा, महेश रेड्डी, पूजा सरकार (झोनल हेड) आणि एमडी आरिफ अशी नावे त्यांनी सांगितली. तसेच ते कंपनीचे उच्च पदाधिकारी असल्याचे भासवले.

गौरव गुप्ता यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी ईमेलद्वारे ‘लेटर ऑफ इंटेंट’, बनावट जीएसटी नंबर, अधिकृत वाटणाऱ्या भरणा पावत्या आणि खोटेच एनओसी फॉर्म पाठवले. या कागदपत्रांच्या आधारे प्रक्रियेच्या नावाखाली गुप्ता यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 5 लाख 61 हजार 500 रुपये आणि 6 लाख 44 हजार 500 रुपये अशी 14 लाख 7 हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यात घेतली.

दरम्यान, पैसे भरून देखील डीलरशिपबाबत कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यातच संबंधितांनी संपर्क देखील बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी नाशिक सायबर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर