ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

लोकसहभागातून ‘पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प’:80 फूट पाषाण विहिरीत पाणी, अप्रुका नदीवर नवा प्रयोग, परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वाढेगाव माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त’ अप्रुका नदीवरील सिमेंट बंधाऱ्यावर पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प राबवला होता. या प्रकल्पामुळे २०० फूट अंतरावर दादासाहेब सोनलकर यांचे शेतात ८० फूट खोलीच्या व ३० फूट व्यासाच्या पाच वर्षापासून कोरड्या असलेल्या पाषाणातून अखंड पाण्याचा प्रवाह सुरू झाला. विहिरीच्या निर्मितीपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीत स्वच्छ भरलेले पाणी पाहून शेतकऱ्यातून या पंचशतावरी प्रकल्पाचे कौतुक होत आहे. या प्रकल्पामुळे परिसरात असणाऱ्या पाच ते सहा विहिरीच्या पाणीसाठ्यात चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे. सन २०२५ मध्ये जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने एक प्रयोग हाती घेऊन अप्रुका नदीवर जि.प. सदस्य अतुल पवार यांच्या सहयोगातून बांधलेल्या सिमेंट नाल्याच्या पाणीसाठाक्षेत्रात शंभर-शंभर फूट खोलीच्या पाच कूपनलिका खोदून त्यामध्ये ७-८ फूट उंचीच्या जमिनीच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच फूट उंच राहतील, अशा केसिंग पाईप लावल्या. त्या पाईपला छोटी छिद्रे पाडून त्यामध्ये खडे, गाळ जाऊ नये म्हणून पाईपला वायरचे कापड गुंडाळले तसेच पाइपच्यावरील तोंडावर झाकण लावून त्या झाकणाला छिद्रे पाडून त्यावर वायरचे कापड गुंडाळले. नंतर पाइप भोवती ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ५ फूट खोलीचे खड्डे घेऊन ते खड्डे छोटी खडी, मध्यम खडी व दगड असे थर देऊन खड्डे बुजवण्यात आले. मे २०२५ मध्ये पाऊस होऊन सिमेंट बंधाऱ्यात साठलेले पाणी त्या परिसरात गेले आणि पाणी साठ्यात वाढ झाली. गावात साकारलेल्या या पंचशतावरी प्रकल्पामुळे ऐन उन्हाळ्यातही परिसरातील विहिरी तसेच कूपनलीकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजवर दरवर्षी कोरड्या असणाऱ्या विहिरीत या आगळया प्रकल्पामुळे पाणी आलेले पाहून शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत असून प्रकल्पाचे कौतुकही होत आहे. ८० फूट खोलीची मोठी विहीर पाडल्यापासून एक मुशी पाषाण दगड लागल्याने विहिरीत एक थेंबही पाणी येत नव्हते. परंतु सिमेंट बंधाऱ्यात पंचशतावरी प्रकल्प राबवल्यामुळे पाझराद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी विहिरीत साठत असल्याचे शेतकरी दादासाहेब सोनलकर यांनी सांगितले. या कामासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव व पंढरपूरचे डॉ. आनंद भिंगे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुहास बाजारे आदींचे सहकार्य लाभले. संस्थेच्या माध्यमातून माण नदी पात्र स्वच्छ केले तरी त्यामध्ये काही प्रमाणात पाणी टिकले तर वृक्षवेली, पशुपक्षी यांचे अस्तित्व राहील. नदीला मिळणाऱ्या ओढ्यामधील पाणी भूगर्भात जिरवले तर ते पाणी नदीपात्राकडे येईल. या हेतूने आमच्या संस्थेने जलसंधारणाचे नवीन अभियान राबवले व त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे या वर्षात दोन ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये असेच प्रयोग राबवणार आहोत. – वैजिनाथ घोंगडे (अध्यक्ष, माणगंगा भ्रमणसेवा संस्था)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर