ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

कोसारा नदीला पूर; पुलावर १ ते २ फूट पाणी, यवतमाळ–चंद्रपूर संपर्क खंडित

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील कोसारा(सोईट )येथे पोलीस व महसूल प्रशासन सतर्क; नागरिकांना पुलावरून प्रवास टाळण्याचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव, दि. ३१ जुलै : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मारेगाव तालुक्यातील  कोसारा येथील (सोईट)नदीला पूर आला असून पुलावर १ ते २ फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग तात्पुरता बंद झाला असून दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क खंडित झाला आहे.

पूरस्थिती लक्षात घेता मारेगाव पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. आज शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पोलीस निरीक्षक सागर दानडे, पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी सागर दिपवार, प्रवीण वंजारी तसेच तहसील प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.

पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर