ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

हरित महाराष्ट्रासाठी सरसावले पुणेकर, 10 लाख सीडबॉल्स अन्…, Video पाहाल तर कौतुकच कराल!

16 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना पर्यावरणाची जाण आणि भान ठेवणारे समाजात काही मोजकेच लोक पाहायला मिळतात. निसर्गाप्रती झोकून देऊन काम करणारी पुण्यातील फ्रेंड् ऑफ रेपटाइल्स अँड एन्व्हायरमेंटल सेव्हिंग ट्रस्ट (फॉरेस्ट) संस्था सध्या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे चर्चेत आहे. या संस्थेतील निसर्गप्रेमींनी यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 10 लाख सीडबॉल्स निसर्गात रुजवण्याचा संकल्प केला आहे. त्या दिशेने संस्थेचे स्वयंसेवक गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने काम करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धनाला चालना देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेच्या या संकल्पाविषयी फॉरेस्ट संस्थेचे बसवराज बनसोडे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

बसवराज बनसोडे यांनी सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात 2021 पासून करण्यात आली. तेव्हापासून संस्थेमार्फत सातत्याने सीडबॉल्स उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष सागर कुटे यांची असून, संस्थेच्या इतर सदस्यांनीही त्याला मोठे पाठबळ दिले आहे.

Success Story : नोकरी सोडली, 2 हजारांत सुरू केला हँडमेड ज्वेलरीचा व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल

या उपक्रमांतर्गत देशी तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या बिया गोळा केल्या जातात. त्यानंतर माती आणि शेणाच्या साहाय्याने सीडबॉल्स तयार केले जातात. हे सीडबॉल्स विविध डोंगराळ आणि वनक्षेत्रांमध्ये टाकण्यात येतात, जेणेकरून पावसाळ्यात या बियांपासून नवीन वृक्षांची निर्मिती होऊन हरित क्षेत्र वाढण्यास मदत होते. तसेच नष्ट होत चाललेल्या देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन करण्याचाही या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

सीडबॉल म्हणजे काय?

सीडबॉल म्हणजे माती, शेणखत आणि देशी वृक्षांच्या बियापासून तयार केलेला छोटा गोळा. पावसाळ्यात ओलावा मिळाल्यानंतर त्यातील बिया नैसर्गिकरित्या रुजतात. कमी हरित क्षेत्र असलेल्या भागांमध्ये वृक्षसंवर्धनासाठी ही संकल्पना प्रभावी ठरत आहे. यंदा या उपक्रमाचा विस्तार करत मोठ्या प्रमाणात सीडबॉल्स तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 1 लाख 60 हजार सीडबॉल्स टाकण्यात आले असून, या मोहिमेत संस्थेच्या अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. 10 लाख सीडबॉल्स रुजवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर