ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे काँग्रेसचे राज्यव्यापी व रास्ता रोको आंदोलन.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महागाई, बेरोजगारी,अग्रिपथ योजना व जीवनावश्यक वस्तु वरील वाढविलेल्या GST विरोधात काँग्रेसचे आंदोलन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुका :- काँग्रेस कमिटी मारेगाव यांचे वतीने आज दिनांक ५ ऑगष्ट २०२२ रोज शुक्रवारला १२ वाजता मार्डी चौक मारेगाव येथे महागाई, बेरोजगारी,अग्रिपथ योजना व जीवनावश्यक वस्तु वरील वाढविलेल्या GST विरोधात. राज्यव्यापी आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. वामनरावजी कासावार (माजी आमदार ) यांच्या नेतृत्वात व मा. नरेंद्र पा. ठाकरे सभापती (कृ.उ.बा.स.) आणि मा.सौ. अरुणाताई खंडाळकर (माजी सभापती जि.प.यव.) मारोती गौरकार अध्यक्ष- तालुका काँग्रेस कमेटी, मारेगांव ,शंकर मडावी नगरसेवक नगर पंचायत, मारेगाव यांच्या उपस्थितीत महागाई, बेरोजगारी,अग्निपथ योजना, GST मारेगाव तालुका दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकर्यांना विशेष पॅकेज जाहीर करा व जीवनावश्यक वस्तु महागाई या विरोधांत राज्यव्यापी आंदोलन व रस्ता रोको करण्यात आले आहे,

तालुका अल्पसंख्याक महिला सेल कमिटी, शहर महिला काँग्रेस कमिटी, तालुका आदिवासी सेल महिला काँग्रस मारेगाव,तथा समस्त काँग्रेस पदाधिकारी मारेगाव तथा सर्व सेल चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.मारेगाव येथील मार्डी चौकातील नवनिर्माण पेट्रोल पंप समोरील भव्य मंडपात काँग्रेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, मारोती गौरकार,उत्तमराव गेडाम, धनंजय आसुटकर, आदींनी केंद्र सरकारच्या महागाई व अडेलतट्टू धोरणावर भाषणातून जोरदार प्रहार केला.

काँग्रेस माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मारेगाव यवतमाळ राज्यमहा मार्गांवर रस्ता रोको व महागाई, बेरोजगारी अग्निपथ व जीवनावश्यक वस्तू वरील वाढविलेल्या जी एस टी [GST] विरोधात दरवाढीचा निषेध करित मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सरकारने घेतलेल्या इंधनदरवाढीच्या निर्णयामुळे लोकांना गाड्यांना धक्का द्यायची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस नेत्यां कडून देण्यात आल्या.

दरम्यान, काही वेळ “रास्ता रोको” आंदोलना नंतर असंख्य आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळात सुटका केली. आंदोलनात मारोती गौरकार अध्यक्ष- तालुका काँग्रेस कमेटी, मारेगांव शंकर मडावी नगरसेवक नगर पंचायत, मारेगाव उत्तमराव गेडाम उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा, ओम ठाकूर माजी शहर अध्यक्ष वणी ,

नंदेश्वर आसुटकर नगर सेवक न.प.मारेगाव , रमन डोये, तुळशीराम कुमरे, विलास वासाडे, नानाजी डाखरे, अरविंद वखनोर, अनिल आत्राम, वसंत आसुटकर कृषी उत्त्पन्न बाजार समिती उपसभापती, शंकरराव मडावी अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,मारेगाव, रवी धानोरकर, यादवराव काळे, यादवराव पांडे, गजानन खापणे, उत्तम दातारकर, वसंतराव लांबट, इस्माईल शेख, छायाताई किनाके नगरसेविका, अनिताताई परचाके, सुषमाताई काळे, बेबीताई बोधले, मालाताई बदकी, मायाताई गाडगे, शकुंतलाताई वैद्य, मंजुषाताई मडावी, मायाताई पेंदोर, जिजाताई वरारकर, काळे मॅडम व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर