ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

करणवाडी फाट्याजवळ ठेकेदार व सहकाऱ्यांकडून तरुणाला मारहाण

7 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई । मारेगाव

मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाटा परिसरात पोल उभारणीच्या कामावरून झालेल्या वादातून एका तरुणाला ठेकेदार व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रदीप नागोराव आत्राम (रा. नरसाळा, ता. मारेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी आत्राम हे मारेगावहून नरसाळा येथे दुचाकीने जात असताना करणवाडी फाट्याजवळील ट्रक विसावा स्थळा जवळ पोल उभारणीसाठी टाकलेल्या गोट्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅक्टर चालकास विचारणा केली असता, “थांब, आमचा ठेकेदार येत आहे,” असे उत्तर देण्यात आले.

थोड्याच वेळात ठेकेदार, ट्रॅक्टर चालक व त्यांचे दोन साथीदार घटनास्थळी आले. त्यांनी प्रदीप आत्राम यांना रस्त्याच्या कडेला नेऊन लोखंडी रॉडने पाठीवर व हातावर मारहाण केली. तसेच हाताबुक्क्यांनी चेहरा व डोक्यावर मारून  जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या हल्ल्यातील तक्रारीनुसार आरोपींची नावे गिरीधारी बाबूलाल सैनी (२५), भोजराज भरतलाल सैनी (२१), छोटू रामकिशोर मिना (३०) व एक अनोळखी व्यक्ती अशी असून सर्वजण रा. गडमोरा, नादोली, करोली (राजस्थान) येथील आहे.जखमी अवस्थेत प्रदीप आत्राम यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ३(५)  बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर