ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ट्रेंड संस्कृती अन‌् वारशाचा थाट राजमाता साडीचा:पैठणीला चढवला नवा साज; साडीवर तुतारी, चंद्रकोर, नथ, शिवमुद्रा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती शिवरायांचा अभिमान अन‌् मराठमोळा लूक तसेच आम्ही स्वराज्याचे पाईक दर्शवण्यासाठी तरुण फेटा, कुर्त्याचा पेहराव करतात, तर आजपर्यंत तरुणी, महिला नऊवारी लूकमध्ये दिसत. यंदा त्यांच्यासाठी खास राजमाता जिजाऊ साडीचा ट्रेंड आहे. राजेशाही लूकची ही साडी ८०० ते २५०० रुपयांत मिळते. सिंथेटिकसह पैठणी लूकमध्ये असलेल्या या साडीत तरुणी मर्दानीसह स्वराज्यजननी जिजाऊंची लेक दिसत असल्याची भावना तरुणी व्यक्त करत आहेत. पैठणीला चढवला नवा साज राजमाता जिजाऊ पैठणी’ ही ‘थीम बेस्ड सॉफ्ट सिल्क साडी’ आहे. पारंपरिक पैठणीचा टच, आधुनिक सॉफ्ट सिल्कचा मिलाफ. मल्टिकलर फ्लोरल बॉर्डर आणि पदरावरील ‘स्वराज्य प्रतीक’. साडीवर तुतारी, चंद्रकोर, नथ, शिवमुद्रा सिंथेटिक मिक्स, प्युअर सॉफ्ट सिल्क सिंथेटिक मिक्स ८०० ते २५०० रुपयांपर्यंत मिळतात. प्युअर सॉफ्ट सिल्क ५००० ते १५००० रुपयांपर्यंत मिळतात. ही साडी रॅली आणि मिरवणुकीसाठी डिझाइन्ड आहे. तिचे वजन ५०० ते ७०० ग्रॅमदरम्यान असते, ज्यामुळे ती दिवसभर नेसण्यास सोयीस्कर ठरते. डिझाइन, प्रतीक, अभिमान ‘तुतारी’ ही विजय, शौर्य घोषणेचे दर्शन घडवते, तर ‘चंद्रकोर’ शिवकालीन परंपरा, राजसत्तेचा समतोल दर्शवते. तलवार लढाऊ संस्कारांचे प्रतीक असल्याने, साडी ट्रेंडिंगला आहे. – ओंकार गंधे, प्राचार्य, डिझायर कॉलेज अँड फॅशन डिझायनर सध्या ट्रेंडिंगमध्ये साडी राजमाता साडी सॉफ्ट सिल्कमुळे वजनाने हलकी होते. ब्लाऊजवरील ‘चंद्रकोर आरीवर्क’ने खुलतात. – श्रुती भुतडा, सॅव्ही फॅशन डिझायनिंग

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर