ब्रेकिंग न्यूज
⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ नाव जाहीर झालं पण डोळ्यावर विश्वास बसेना! ना वर्ल्ड कप जिंकवणारा यमाल, ना लिओनेल मेस्सी… कोण ठरला Ballon … ✦ ⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ शिक्षणानंतर घेतला धाडसी निर्णय, सोलापूरच्या तरुणाच यशस्वी कुक्कुटपालन, महिन्याला 20 लाख उलाढाल ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र…
SP News Maregaon

Nashik News: हळद, धने अन् मिरची पावडरचं धक्कादायक वास्तव, दिवाळीआधी मुंढेंच्या टीमची मोठी कारवाई, नाशिकमध्य…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक: दिवाळीआधी तुकाराम मुंढे यांचा अन्न व औषध प्रशासन विभाग भेसळ रोखण्यासाठी सतर्क झाला आहे. सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत नाशिक विभागाने द्वारका परिसरातील मे. सोमेश्वर घरगुती मसाले कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत प्रशासनाने नियमभंग आणि मिसब्रँडिंगप्रकरणी तब्बल २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त केला असून, जप्त केलेल्या साठ्याची किंमत ११ लाख ८६ हजार २०० रुपये आहे.

सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नाशिक विभागाने द्वारका परिसरातील एका मसाल्याच्या कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये प्रशासनाने ११ लाख ८६ हजार २०० रुपये मूल्याचा २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. अन्नपदार्थांचा दर्जा निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचा संशय आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

15 महिला अन् 2 पुरुष… गेस्ट हाऊस नव्हे, हे तर भलतंच प्रकरण, कल्याणमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. द्वारका येथील तिगरानिया औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५६, सर्व्हे क्रमांक ४०२/४०२/१ येथील मे. सोमेश्वर घरगुती मसाले कारखान्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या मसाल्यांच्या पॅकिंगवर लेबलिंगविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले.

जप्त करण्यात आलेला मसाल्याचा साठा

प्रशासनाने जप्त केलेल्या ११,८६,२०० रुपयांच्या मसाल्यांच्या साठ्यामध्ये विविध प्रकारच्या पावडर व मसाल्यांचा समावेश आहे. यामध्ये हळद पावडर ३३८ किलो (किंमत २,०२,८०० रुपये), कांदा-लसूण मसाला ४८ किलो (किंमत १९,२०० रुपये), धणे पावडर २८८ किलो (किंमत १,९५,२०० रुपये), सुपर मिक्स गरम मसाला २१६ किलो (किंमत ७५,६०० रुपये), स्पेशल मिक्स काळा मसाला ६६४ किलो (किंमत २,६६,४०० रुपये), काळा मसाला ३३८ किलो (किंमत २,३६,६०० रुपये) आणि मिरची पावडर ३३८ किलो (किंमत २,७०,४०० रुपये) यांचा समावेश आहे.

प्रशासनाचा इशारा

सणा-सुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळ करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएकडून आगामी काळातही कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर